शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संचालकांकडून नुसताच कागदी ‘खेळ’ !

By admin | Updated: January 1, 2015 00:26 IST

बीड : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसूळ यांच्या विरूद्ध विविध २२ संस्थांनी कामात हलगर्जीपणा आणि कामचुकारपणा करीत असल्याची तक्रार केली होती

बीड : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसूळ यांच्या विरूद्ध विविध २२ संस्थांनी कामात हलगर्जीपणा आणि कामचुकारपणा करीत असल्याची तक्रार केली होती, याची दखल घेत उपसंचालकांनी चौकशी केली होती, यामध्ये आडसूळ या दोषी आढळल्या होत्या, मात्र तेव्हापासून अद्यापर्यंत कसलीच कारवाई झाली नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.येथील जिल्हा क्रीडा कार्यालयाचा कारभार सध्या ढिसाळ सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. कार्यालयातील अस्वच्छता, क्रीडांगणाचे रखडलेले प्रस्ताव आणि खेळाडूंना मिळत नसलेल्या सुविधा यामुळे या कार्यालयाबद्दल संताप व्यक्त होत आहे. हाच धागा पकडून मागील काही वर्षापासून या कार्यालयाबद्दल उपसंचालकांकडे तक्रारी केल्या जात आहेत. मात्र या तक्रारीची दखल घेतली जात नव्हती. वारंवार तक्रारी येत असल्याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांनी चौकशी करण्याचे आदेश उपसंचालकांना दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी याची चौकशी केली, विशेष म्हणजे, एक, दोन नव्हे तर चार वेळेस आडसूळ चौकशी केली होती. यामध्ये त्या दोषी आढळल्या होत्या. हाचा अहवाल पुन्हा क्रीडा संचालनालयाला प्राप्त झाला. आणि हेी फाईल मंत्रालयात गेली. मात्र यावर कसलीच कारवाई झाली नाही.एकीकडे आडसुळ यांच्याविरोधातील तक्रारीचा अहवाल मंत्रालयात पडून होता तर दुसऱ्या बाजुला संस्था आक्रमक झाल्या होत्या. या संस्थांनी पुन्हा तक्रार केली. त्याप्रमाणे २५ आॅगस्ट २०१४ रोजी औरंगाबाद विभागाचे क्रीडा उपसंचालक सी.आर. कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नेमून पाहणी केली होती. त्यानंतर याचा अहवाल क्रीडा संचालनालयाला ११ सप्टेंबर २०१४ रोजी प्राप्त झाला होता. यामध्येही त्या दोषी आढळल्या होत्या.काय आढळले होते चौकशीत ?कार्यालयाच्या दर्शनी भागात पायऱ्यांची तोडफोड, परीसरात गवत, स्वच्छता गृहात पाणी, ट्यूबलाईट यांचा अभाव, स्वच्छतागृहाची अस्वच्छता. भिंतीही दुर्गंधीयुक्त होत्या, पहिल्या मजल्यावरील स्वतंत्र स्वच्छतागृहही अस्वच्छ, तीसऱ्या मजल्याच्या जिन्यामध्ये जंपींग मॅट पडलेल्या होत्या, या येथे कशा काय विचारले असता, क्रीडधिकाऱ्यांनी आपण पहिल्यांदाच पाहत असल्याचे सांगितले. क्रीडा साहित्यसाची आपणास माहिती नाही, असे या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. योजनांचे प्रस्तावही रखडलेलेच होते, हे प्रस्ताव फरशीवर पाण्याने भिजलेल्या अवस्थेत होते, इमारतींच्या दुरूस्तीबाबतची कसलीच काळजी आपल्याला नाही. यावरील खर्चाचा तपशीलही नाही. संकुलाच्या खात्यामध्ये शिल्लक असलेल्या १.६४ कोटी निधीतून कोणत्या सुविधा निर्माण करावयाच्या याबाबत कसलाही आराखडा नाही, तालुका क्रीडा संकुलाचा निधीही अखर्चीत आहे, यासारखे अनेक मुद्दे यामध्ये नमुद करण्यात आलेले आहेत.याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसूळ यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही. (प्रतिनिधी)