मदनी चौकात सुसाट कारने चौघांना उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:20 IST2019-11-29T12:17:37+5:302019-11-29T12:20:07+5:30
चालक पोलिसांच्या ताब्यात

मदनी चौकात सुसाट कारने चौघांना उडविले
औरंगाबाद : सुसाट वेगातील टॅक्सी कारने मदनी चौक ते रोशनगेट रस्त्यावर गुरुवारी रात्री चौघांना उडवीत गंभीर जखमी केले. यावेळी कारने रस्त्यावरील काही वाहनांनाही उडवल्याने नुकसान झाले. जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले.
गुरुवारी रात्री १०.३० ते १०.४५ वाजेच्या सुमारास टॅक्सी कारच्या (एमएच- २० ईजी - ७७६६) चालकाचा मदनी चौकाजवळील हॉटेल दरबारसमोर ताबा सुटला. पुढे काही अंतरावर जाईपर्यंत त्याने तीन ते चार पादचा-यांना उडवले. तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या काही वाहनांना धडक दिली. पुढे जाऊन ती रोशनगेटच्या अलीकडील हॉटेलच्या पायºयांवर जाऊन धडकली. जखमींना तात्काळ जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारचे नुकसान झाले होते. जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी जमा झालेल्या बघ्यांची गर्दी पांगवली.