शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

५८ लाखांची वीज बिले माफ

By admin | Updated: May 30, 2014 00:35 IST

हिंगोली : गारपिटीत नुकसान झालेल्या आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना विशेष पॅकेजद्वारे वीज बिलात सवलत देण्यात आली आहे.

हिंगोली : गारपिटीत नुकसान झालेल्या आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना विशेष पॅकेजद्वारे वीज बिलात सवलत देण्यात आली आहे. यंदा जानेवारी ते जून दरम्यानच्या कालावधीची वीज देयके शासनाकडून भरल्या जाणार आहेत. जिल्ह्यात त्याचा फायदा १३७ गावातील ३ हजार ७९९ शेतकर्‍यांना मिळणार असून एकूण ५८ लाख ७० हजारांची बिले माफ केली आहेत. राज्यात फेब्रुवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. त्यात शेती पिके आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शासनाने परिपत्रक काढून विशेष पॅकेज जाहीर केले आहे. प्रामुख्याने त्यात अपद्ग्रस्त शेतकर्‍यांची जानेवारी ते जून दरम्यानच्या कालावधीची वीज देयके राज्य शासनाकडून करण्यात येणार आहेत. म्हणून जिल्ह्यातील आपद्ग्रस्त शेतकर्‍यांची माहिती महावितरणने महसूल विभागाकडून मागवली होती. त्याआधी कृषी विभाग आणि महसूल विभागाने गारपीटीचा संयुक्त सर्वे केला होता. सर्वेक्षणात हाती आलेली माहिती महसूल विभागाने जिल्हा महावितरणला दिली. महावितरणने ही माहिती वरिष्ठ कार्यालयामार्फत शासनाला दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १३७ गावातील शेतीपंपधारकांना फायदा झाला आहे. एकूण ३ हजार ७९९ आपद्ग्रस्त शेतकर्‍यांची ५८ लाख ७० हजार रूपयांची बिले माफ करण्यात आली आहेत. त्याचा सर्वाधिक फायदा औंढा नागनाथ तालुक्यातील १८ गावांतील उत्पादकांना झाला आहे. तालुक्यातील १ हजार ५७३ ग्राहकांचे २५ लाख ८७ हजारांची बिले माफ झाली आहेत. त्याखालोखाल सेनगाव तालुक्यातील २८ गावांना झाला आहे. येथील १ हजार ३४५ कृषीपंपधारकांची १९ लाख २५ हजारांची बिले माफ करण्यात आली आहेत. वसमत तालुक्यातील २१४ ग्राहकांना फायदा झाला आहे. १८ गावातील शेतकर्‍यांचे ३ लाख ६७ हजारांची बिले माफ झाली आहेत. सर्वात कमी बिले माफ कळमनुरी तालुक्यातील झाली आहेत. तालुक्यातील १३ गावातील ५०० शेतकर्‍यांची २ लाख ७७ हजार रूपयांची बिले माफ झाली आहेत. हिंगोली तालुक्यातील ६० गावांना या बिल माफीचा लाभ मिळाला आहे. ५०० शेतकर्‍यांची ७ लाख १३ हजारांची बिले माफ करण्यात आली आहेत. यंदा अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांची त्रैमासिक का होईना बिले माफ झाल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी) राज्य शासनाने परिपत्रक काढले शासनाने परिपत्रक काढून पॅकेज जाहीर केल्याने आपद्ग्रस्त शेतकर्‍यांची जानेवारी ते जून दरम्यानच्या कालावधीची वीज देयके राज्य शासनाकडून करण्यात आली आहेत. म्हणून जिल्ह्यातील आपद्ग्रस्त शेतकर्‍यांची माहिती महसूलकडून महावितरणने मागवली होती . जिल्ह्यातील १३७ गावातील एकूण ३ हजार ७९९ आपद्ग्रस्त शेतकर्‍यांची ५८ लाख ७० हजार रूपयांची बिले करण्यात आली माफ. सर्वाधिक फायदा औंढा नागनाथ तालुक्यातील १८ गावांतील १ हजार ५७३ शेतकर्‍यांचे २५ लाख ८७ हजारांची झाली बिले माफ . हिंगोली तालुक्यातील ६० गावांना या बिल माफीचा लाभ मिळाला असून एकूण ५०० शेतकर्‍यांची ७ लाख १३ हजारांची बिले माफ . यंदा अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांची बिले माफ झाल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला . हिंगोली महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्या उशिरा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची पुनर्पडताळणी करता आली नसल्याने काही शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात. लवकर याद्या प्राप्त झाल्या असल्या तर पडताळणी करून नजर चुकीने नाव न नोंदविल्या गेलेल्या शेतकर्‍यांना लाभ मिळाला असता. एम.एन. सिर्से, प्रभारी कार्यकारी अभियंता, हिंगोली. - एम.एन. सिर्से, प्रभारी कार्यकारी अभियंता, महावितरण, हिंगोली.