शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

जावयाने सासऱ्याचा प्लाॅट बनावट सह्या करून विकला; मूळ कागदपत्रेही केली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 7:59 PM

जावयाने प्रथम खोट्या सह्या करुन सदरचा प्लॉट स्वत:च्या नावावर करून घेतल्याचे उघडकीस आले.

औरंगाबाद : सासऱ्याने स्वत:चा भाडेकरारनामा करून दिलेला प्लॉट परस्पर बनावट सह्या करुन जावयाने तिसऱ्याच व्यक्तीला विकल्याची घटना उघडकीस आली आहे. जावयाने सासऱ्याच्या घरातील प्लॉटचे मूळ कागदपत्रेही गायब केले आहेत. या प्रकरणी सासऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन जावयाविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहर कॉलनी येथील रहिवासी विजय हिरालाल अग्रवाल (६१) यांचा बगशेरगज दाऊदपूर येथील सर्वे नंबर १० मध्ये प्लॉट आहे. त्यांनी हा प्लॉट २०१२ मध्ये खरेदी केला होता. नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांनी एका व्यक्तीस नोंदणीकृत भाडे करारनामा करून ३६ महिन्यांकरिता गॅरेज वापरासाठी दिला होता. हा करारनामा करताना साक्षीदार विजय अग्रवाल यांचे जावई निलेश प्रेमकुमार अग्रवाल हे होते. या घडामोडीनंतर २० जुलै रोजी काही व्यक्ती प्लॉटच्या जागेवर येत हा प्लॉट विजय अग्रवाल यांच्या जावयाने विकल्याचे सांगितले.

या घटनेनंतर विजय अग्रवाल यांनी घरात प्लॉटचे मूळ कागदपत्रे शोधले असता सापडले नाहीत. तसेच जावई निलेश अग्रवाल याने खोट्या सह्या करुन सदरचा प्लॉट स्वत:च्या नावावर करून घेतल्याचे उघडकीस आले. यानंतर तो प्लॉट अन्य व्यक्तीला विकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सासऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादfraudधोकेबाजी