कुटुंबाकडून दुसऱ्या विवाहाचा आग्रह; वैतागून तरुणाचा पोलीस आयुक्तालयात आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 11:55 IST2019-09-18T11:44:39+5:302019-09-18T11:55:57+5:30

तरुणाला पोलिसांनी तातडीने घाटीत  दाखल केले. 

Solicitation of second marriage from family; Suicide attempt at police commissioner building in Aurangabad | कुटुंबाकडून दुसऱ्या विवाहाचा आग्रह; वैतागून तरुणाचा पोलीस आयुक्तालयात आत्महत्येचा प्रयत्न

कुटुंबाकडून दुसऱ्या विवाहाचा आग्रह; वैतागून तरुणाचा पोलीस आयुक्तालयात आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद : दुसऱ्या विवाहासाठी कुटुंबाने केलेल्या आग्रहामुळे वैतागलेल्या ३५ वर्षीय तरुणाने मंगळवारी पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्या तरुणाला पोलिसांनी तातडीने घाटीत  दाखल केले. 

शेख मुसा शेख मुश्ताक (३५, रा. जिन्सी परिसर), असे त्याचे  नाव आहे. त्याचा विवाह झालेला आहे. त्याने दुसरा विवाह करावा, असा कुटुंबाचा आग्रह होता; परंतु तो विवाहासाठी नकार देत होता. यातून तो मंगळवारी सकाळी १०.३० पोलीस आयुक्तात आला. तेथील पायऱ्यांवर अर्धा तास बसल्यानंतर तो पहिल्या मजल्यावर आला. सायबर शाखेच्या दिशेने असलेल्या गॅलरीजवळून त्याने उडी घेतली. यात तो जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

Web Title: Solicitation of second marriage from family; Suicide attempt at police commissioner building in Aurangabad