शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तक्रारींची दखल, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:06 IST

जयश्री सोनकवडे यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधींकडून विविध प्रकरणात केलेल्या अनियमिततेबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : वाढत्या तक्रारींची दखल घेऊन समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची बदली करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून त्या या पदावर कार्यरत होत्या. आता त्यांचा पदभार छत्रपती संभाजीनगर येथील उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य दीपक खरात यांच्याकडे जाणार आहे

सहसचिव सो. ना. बागुल यांच्या सहीने या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. बदलीच्या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ व्हावी असे त्यात म्हटले आहे. दरम्यान जयश्री सोनकवडे यांनी या बदलीला मॅटमध्ये आव्हान देण्याचे ठरवले आहे. बदली झाल्यानंतर एक पोस्ट जयश्री सोनकवडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल केली होती. मात्र नंतर ती डिलिट केली. या पोस्टमध्ये त्यांनी ही बदली माझ्यावर अन्यायकारक असल्याचे म्हटले होते.

कामकाजाबाबत लोकप्रतिनिधी व जनतेत तीव्र नाराजीबदली आदेशाच्या प्रस्तावनेत सो. ना. बागुल यांनी म्हटले आहे की, जयश्री सोनकवडे यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधींकडून विविध प्रकरणात केलेल्या अनियमिततेबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच त्यांची बदली करण्यासाठी निवेदने मिळाली आहेत. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीच्या प्रवर्गसाठी विविध योजना राबवण्यात येतात. योजनांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सोनकवडे यांच्या कामकाजाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होत असून कामकाजाबाबत लोकप्रतिनिधी व जनता तीव्र नाराजी व्यक्त करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरळीत होण्यासाठी त्यांची बदली शासनाच्या विचाराधीन होती.

सामाजिक न्याय मंत्र्यांना निवेदनदरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (राजरत्न आंबेडकर) शहराध्यक्ष प्रमोद ढाले यांनी या बदलीचे स्वागत केले आहे. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की सोनकवडे यांची बदली व्हावी यासाठी आम्ही वरिष्ठांना व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना निवेदने दिली होती. सोनकवडे या मागासवर्गीयांची कामे जाणीवपूर्वक करीत नव्हत्या. अर्जदारांची काहीही त्रुटी नसताना त्या कर्जप्रकरणे प्रलंबित ठेवत असत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSocial welfare divisional officeसमाजकल्याण उपायुक्त कार्यालय