शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात आतापर्यंत २८ इमारतींवर घाव

By admin | Updated: December 18, 2014 00:42 IST

औरंगाबाद : सातारा- देवळाई परिषदेने आतापर्यंत २८ अतिरिक्त बांधकामांवर घाव घातले असून, २६ इमारतींना ‘जैसे थे’ आदेश मिळाला आहे.

औरंगाबाद : सातारा- देवळाई परिषदेने आतापर्यंत २८ अतिरिक्त बांधकामांवर घाव घातले असून, २६ इमारतींना ‘जैसे थे’ आदेश मिळाला आहे. १८ डिसेंबर रोजी अंतिम तारखेला न्यायालयातील चर्चेअंती पुढील कार्यवाही स्पष्ट होणार असल्याने त्याकडे सातारा- देवळाईवासीयांचे लक्ष लागले आहे. न.प.ने आज दोन कामांवर हातोडा चालविला. गट नं. ११६ मधील इमारतीचे दोन मजले, तर गट नं. १३८ मधील पारस कासलीवाल यांच्या इमारतीच्या एका अतिरिक्त मजल्यावर कर्मचाऱ्यांंनी हातोडा चालविला. नगर परिषदेच्या कारवाईने ३५० अतिरिक्त बांधकाम इमारतींपैकी ‘अबतक २८’चा आकडा पार केला आहे. अनेकांनी तर अगदी हतबलतेने स्वत:हूनच घरावर हातोडा चालविणे पसंत केले. साताऱ्याला पोलीस छावणीचे रूपसातारा परिसरात दंगाकाबू वज्र व्हॅन, सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा, पोलीस अधिकारी, महिला पोलीस, चार ब्रेकरचे ट्रॅक्टर, जेसीबी मशीन व ४४ हातोडे, असा ताफा फिरतो. ज्या कामांना नोटिसा दिल्या आहेत, त्यापैकी एकावर हातोड्याचे घाव सुरू होतात. पोलिसांच्या बंदोबस्तात नगर परिषदेचे अतिक्रमण हटाव पथक पाहून अनेकांच्या काळजात धडकी भरत आहे. दररोज सकाळी १० वाजेनंतर बीड बायपासने फौजफाटा निघतो, त्यावेळी एकमेकांना फोन करून विचारपूस केली जाते, ‘अरे तुमच्या कॉलनीत आले का, आमच्याकडून निघाले. आम्ही आज वाचलो’, असा प्रकार सुरू आहे. जनतेच्या सेवेसाठी काही कर्मचारी कार्यालयातसातारा-देवळाई नगर परिषदेचे सर्वच कर्मचारी तोडफोडीच्या कामात गुंतल्याने नागरिकांची कैफियत ऐकण्यास कोणीच नसल्याची ओरड नागरिकांतून वाढल्याने अखेर नगर परिषदेत महत्त्वाची कामे सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना तोडफोड पथकातून वगळण्यात आले आहे. पाणीपुरवठा हाच महत्त्वाचा विषय असल्याने नागरिक गाऱ्हाणी मांडत आहेत. ४ टँकरच्या फेऱ्या नेमक्या जातात कुठे, असा सवाल स्थानिक नागरिकांतून उपस्थित होत आहे.