शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

पार्सलच्या नावाखाली हमसफर ट्रॅव्हल्समधून रोख रक्कम, गुटख्याचीही तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 19:50 IST

हमसफर कार्यालयाच्या तपासणीत आश्चर्यकारक बाब उघड, गुटख्याचे पार्सलही सापडले

छत्रपती संभाजीनगर : ट्रॅव्हल्समधून पाठवल्या जाणाऱ्या पार्सलच्या बॉक्समधून रोख रक्कमेचीही तस्करी होत आहे. काही दिवसांपूर्वी सील केलेल्या हमसफर ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयाच्या तपासणीत रविवारी ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

१९ ऑक्टोबर रोजी शहरात नशेसाठी पुरवठा होणाऱ्या औषध विक्रीचे रॅकेट उघडकीस आले. ग्वाल्हेरपर्यंत या रॅकेटचे सूत्रे हाती लागले. या सर्व औषधांची तस्करी ट्रॅव्हल्स बसच्या माध्यमातून होत असल्याचे सबळ पुरावे निरीक्षक गीता बागवडे यांना मिळाले. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी त्यांनी यात प्रमुख सहभाग असलेल्या हमसफर ट्रॅव्हल्स कंपनीचे क्रांती चौक येथील मुख्य कार्यालय सील केले. रविवारी बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, संदीप शिंदे यांनी कार्यालयातील संशयास्पद पार्सलची तपासणी केली. यात प्रामुख्याने एका पार्सलमध्ये गुटख्याचे पाच बॉक्स आढळून आले. त्यामुळे आता ट्रॅव्हल्समधून गुटख्याचीदेखील तस्करी सुरू झाल्याचे पाहून पोलिसही थक्क झाले.

ना सेंडर, ना रिसिव्हरपार्सलपैकी एक बॉक्सवर पोलिसांना अधिक संशय आला. बॉक्सवर केवळ एका व्यापाऱ्याच्या नावाचा उल्लेख होता. दोन बॉक्स, त्यानंतर थर्माकॉल व त्याच्या आत १ लाख ७५ हजार रोख रक्कम ठेवलेली होती. विशेष म्हणजे, त्यावर पाठवणाऱ्याचा कुठलाही उल्लेख नव्हता. पाेलिसांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना याबाबत प्रश्न केल्यानंतर त्यांनाही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. सर्व रक्कम, गुटखा पोलिसांनी जप्त केला. पैसे कोणी कोणाला पाठवले, कशासाठी पाठवले, याचा आता तपास केला जात आहे. अंमलदार संदीपान धर्मे, महेश उगले, विजय त्रिभुवन, कल्याण निकम, छाया लांडगे, ज्याेती भोरे यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर