शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या प्रस्तावास मंजुरी

By admin | Updated: July 30, 2015 00:18 IST

जालना : नगर पालिकेने आयोजिलेल्या विशेष सर्वसाधारणसभेत शहरातील स्वच्छता तसेच बंद असलेल्या पथदिव्यांचा मुद्दा सदस्यांनी चांगला उचलून

जालना : नगर पालिकेने आयोजिलेल्या विशेष सर्वसाधारणसभेत शहरातील स्वच्छता तसेच बंद असलेल्या पथदिव्यांचा मुद्दा सदस्यांनी चांगला उचलून धरल्याने सभा गाजली. याच गडबडीत स्मार्ट सिटी, अमृत व सर्वांकरिता आवास योजनेच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी ११ वाजता नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरु झाली. यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी दीपक पुजारी, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, उपमुखाधिकारी के.के. मुखेडकर उपस्थित होते. केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजनांचे प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे तसेच गुंठेवारी भूखंडाचे नियमन करणे यासह विविध मुद्यांवर सदस्यांनी आपली मते मांडली. नगर पालिका प्रशासनास जबाब विचारला. माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी वरील दोन्ही महत्वकांक्षी योजनांबाबत मुख्याधिकाऱ्यांना कोंडीत पकडले. सुमारे ९० कोटी रुपये लागणार आहेत. या योजना राबविण्यासाठी नगर पालिकेकडे काय उपाययोजना आहेत, या पालिकेने सभागृहास अशी मागणी राऊत यांनी केली. इतर सदस्यांनी राऊत यांना पाठिंबा देत पैशांची काही तरदूत आहे याची जोरदार विचारणा केली. मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी किरकेळ उत्तरे देत वेळ मारुन नेली. पालिका मूलभूत सुविधा पुरविता का? प्रत्यक्ष स्वच्छता होती का? अंतर्गत जलवाहिनी तकलादू झाल्याने सर्वांना पाणी मिळते का? आदी अनेक सवाल राऊत यांनी उपस्थित केले. नगरसेवक विजय कामडही यांनीही स्वच्छतेचा मुद्दा जोरकासपणे मांडून मुख्याधिकाऱ्यांसह पालिका प्रशासनास धारेवर धरले. डिझेलअभावी ट्रॅक्टर प्रभागात येत नसल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येत असल्याचे कामड म्हणाले. बहुसंख्य नगरसेवकांनी शहरातील अनेक दिवसांपासून बंद असलेल्या पथदिव्यांच्या मुद्यांवर मुख्याधिकारी जबाब विचारला. वर्षभरापूर्वीच दुरुस्त करण्यात आलेले पथदिवे कसे बंद आहेत, याची विचरणा केली. याचे समाधानकारक उत्तरे पालिका प्रशासना देता आली नाही. काही नगरसेवकांनी विद्युत अभियंता पोलास यांना धारेवर धरले. दिवे बंद असल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे नगरसेवकांनी पटवून दिले. (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी, अमृत व सर्वांकरिता निवास या योजनेत देशातील ५०० शहरांचा समावेश असून, त्यात जालना शहराचा समावेश करण्यात आला आहे. १ जुलै २०१५ अन्वये स्मार्ट सिटी अभियान केंद्र शासनामार्फत जनतेचे जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छ व शाश्वत व पर्यावरणपूरक शहर तयार करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. यात पालिका जी कामे राबविणार आहे, त्याला गुण मिळणार आहेत. अमृत योजनेमुळे शहर होणार हायटेक ४केंद्राच्या अटल पुनर्निमान व शहर परिवर्तन योजनेमुळे शहर हायटेक होण्यास मदत मिळणार आहे. यात प्रत्येक घरास पाणीपुरवठा व प्रत्येक घरास नळजोडणी, सेप्टीक टँक, पावसाची पाणी निचरा करण्यासाठी वर्षा जल नाले, पादचारी मार्ग, सार्वजनिक परिवहन व्यवस्था, पार्किंग सुविधा, हरित स्थळांचा विकास, मुलांसाठी मनोरंजन केंद्र सुरु करण्यात येणार आहे. ही योजना २०१५-१६ पासून २०१९-२० पर्यंत राबविण्यात येणार आहे. तर सर्वांकरिता आवास योजनेतंर्गत २०२२ पर्यंत देशातील सर्व कुटुंबांना राहण्याकरिता घरे उपलब्ध होणार आहेत. इतर योजनासांठी विशेष सभा का नाही? ४दलित वस्तीसह इतर योजना पालिका राबविते. यासाठी लाखोंचा निधी येतो. त्यासाठी विशेष सभा का बोलविली जात नाही, असा सवाल काही नगरसेवकांनी केला.