शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणपत्र वाटपाची ‘गती मंद’

By admin | Updated: December 15, 2014 00:50 IST

बापू सोळुंके, औरंगाबाद औरंगाबाद : राज्य सरकारने गतवर्षीपासून अपंगांना आॅनलाईन प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

बापू सोळुंके, औरंगाबादऔरंगाबाद : राज्य सरकारने गतवर्षीपासून अपंगांना आॅनलाईन प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याकरिता घाटीत प्रमाणपत्र देणारे चार विभाग आणि नोंदणीसाठी केवळ दोन संगणक उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असून, त्या प्रमाणात नोंदणी होत नसल्याने दिवसेंदिवस प्रतीक्षा यादी वाढतच असल्याचे समोर आले आहे. आज अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्यांना घाटी प्रशासनाकडून दोन वर्षे थांबण्याचा सल्ला दिला जात आहे.केंद्र आणि राज्य शासनाने अपंग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय भावनेतून विविध योजना आणलेल्या आहेत. या शिवाय त्यांना बस, रेल्वे प्रवासातही सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे काही डॉक्टरांना हाताशी धरून बोगस अपंग प्रमाणपत्र काढून देणारे रॅकेट अनेक ठिकाणी पोलिसांनी उद्ध्वस्त केले. घाटी रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागातूनही अशा प्रकारे बोगस प्रमाणपत्र काढण्यात आल्याचे दोन वर्षांपूर्वी उघडकीस आले होते. यावर उपाय म्हणून शासनाने राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतून देण्यात येणारे अपंग प्रमाणपत्र आॅनलाईन केले आहे. एवढेच नव्हे, तर यापूर्वी देण्यात आलेल्या अपंग प्रमाणपत्राचीही आॅनलाईन नोंदणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे, तसेच अपंग प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे गतवर्षीपासून नव्याने अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी दाखल होणाऱ्यासोबतच याआधी अपंग प्रमाणपत्र घेतलेली मंडळीही आॅनलाईन नोंदणीकरिता घाटीत येत आहेत. विभाग चार, संगणक दोनअस्थिव्यंग, अंध व्यक्ती, मनोविकार असलेले आणि मूकबधिरांना वेगवेगळ्या विभागाकडून प्रमाणपत्र देण्यात येतात. अपंग प्रमाणपत्रासाठी आलेल्या व्यक्तीची संबंधित विभागातील तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करतात. त्यानंतर त्याच्यातील अपंगत्वाची नोंदणी संगणकात केली जाते. नोंदणीसाठी प्रत्येक विभागाचे दिवस निश्चित करण्यात आले आहेत. आॅर्थोपेडिक विभागाकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने त्यांना आठवड्यातून दोन दिवस नोंदणीसाठी देण्यात आले आहेत, तसेच अशीच गर्दी मनोविकृतीशास्त्र विभाग, कान, नाक, घसा विभागातही असते. मनोविकृतीशास्त्र विभागात प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने आॅनलाईन प्रमाणपत्राची नोंदणी करण्याचा त्यांचा दिवस असूनही नोंदणी झाली नाही. परिणामी रुग्णांना चकरा मारण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही.