शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सिरेहक शाह बाबांचा उरुस आजपासून

By admin | Updated: April 23, 2016 23:54 IST

हिंगोली : येथील रिसाला बाजार परिसरातील धार्मिक एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सिरेहक शाह बाबा रहेमतुल्ला अलैहच्या ३६५ व्या उरुसाला २४ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे.

हिंगोली : येथील रिसाला बाजार परिसरातील धार्मिक एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सिरेहक शाह बाबा रहेमतुल्ला अलैहच्या ३६५ व्या उरुसाला २४ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. २५ एप्रिल रोजी उरुसनिमित्त संदलचा कार्यक्रम आहे. यानिमित्त दरगाह परिसरात २७ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याची तयारीही जवळपास पूर्ण झालेली आहे. २४ एप्रिल रोजी उरुसाला प्रारंभ होईल. या दिवशी रात्री ९ वाजता जळगाव येथील अब्दुल लतिफ हैरा यांच्या मुशायऱ्याचे आयोजन केले आहे. २५ एप्रिल रोजी रिसाला बाजार परिसरातून दुपारी एक वाजता संदलची मिरवणूक निघणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून रात्री ९ वाजता संदल दरगाह परिसराकडे येईल. तर उरुस कमिटीच्या वतीने २६ एप्रिल रोजी दरगाह परिसरात सायंकाळी ५ वाजता कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात उत्तर प्रदेशच्या रौशनी वारसी आणि मुंबई येथील शमीम शोले यांचे सादरीकरण होणार आहे.यशस्वीतेसाठी उरुस कमिटीचे अध्यक्ष, दरगाह कमिटीचे अध्यक्ष सुरेशअप्पा सराफ, नामदेव घुगे, आजमखान, सय्यद सालार, अन्वर मुनीरखान पठाण, दत्तराव बांगर यांच्यासह कमिटीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)