महसूल विभागात खळबळ: सिल्लोडमध्ये नायब तहसीलदारासह सेतू चालक लाच घेताना जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:48 IST2026-04-07T12:48:36+5:302026-04-07T12:48:52+5:30

१० हजार स्वीकारताना सेतू चालकासह नायब तहसीलदार रंगेहाथ पकडले

Sillod Naib Tehsildar Harun Sheikh Caught Red-handed Accepting Bribe for Sand Transport. | महसूल विभागात खळबळ: सिल्लोडमध्ये नायब तहसीलदारासह सेतू चालक लाच घेताना जाळ्यात

महसूल विभागात खळबळ: सिल्लोडमध्ये नायब तहसीलदारासह सेतू चालक लाच घेताना जाळ्यात

सिल्लोड : वाळूची वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी आणि दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिल्लोड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आणि खाजगी सेतू केंद्र चालक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. ६) दुपारी १२ वाजता रंगेहाथ पकडले.

सिल्लोड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार हारुण अजीज शेख (वय ५६) यांनी ४ एप्रिल रोजी तक्रारदाराचा ट्रॅक्टर पकडला होता. तक्रारदाराकडे रीतसर परवाना असतानाही, जास्त गौण खनिज असल्याचे सांगून दंडात्मक कारवाईची धमकी शेख यांनी दिली होती. ही कारवाई टाळण्यासाठी आणि भविष्यात वाळू वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. अखेर तडजोडीअंती १५ हजार रुपये ठरले. त्यापैकी १० हजार रुपये खाजगी सेतू केंद्र चालक युवराज अभिमान तायडे याच्याकडे देण्याचे नायब तहसीलदारांनी सांगितले होते.

दरम्यान, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील 'एसीबी' कार्यालयात धाव घेतली. त्यानुसार, सोमवारी सकाळी ११ वाजेपासून पथकाने तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. दुपारी १२ च्या सुमारास नायब तहसीलदार शेख यांच्या इशाऱ्यानुसार तायडे याने १० हजार रुपये स्वीकारले. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोघांना झडप घालून ताब्यात घेतले.

शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वाल्मीक कोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सोमवारी रात्री उशिरा दोन्ही आरोपींविरुद्ध सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींकडील रोख रक्कम आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे.

Web Title : सिल्लोड: रिश्वत लेते राजस्व अधिकारी, एजेंट गिरफ्तार

Web Summary : सिल्लोड में एक राजस्व अधिकारी और निजी एजेंट को अवैध रेत परिवहन की सुविधा देने और जुर्माने से बचने के लिए ₹10,000 की रिश्वत लेते हुए गिरफ्तार किया गया। भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो ने शिकायत दर्ज होने के बाद उन्हें रंगे हाथों पकड़ा।

Web Title : Sillod: Revenue Officer, Agent Arrested for Accepting Bribe

Web Summary : A revenue officer and private agent in Sillod were arrested for accepting a ₹10,000 bribe to facilitate illegal sand transportation and avoid penalties. The Anti-Corruption Bureau caught them red-handed after a complaint was filed.