शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

९६ लाखांच्या ड्युलडेस्कची खरेदी

By admin | Updated: December 18, 2015 23:31 IST

परभणी : मानव विकास मिशनच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ९६ लाख रुपये खर्च करुन १ हजार ९२६ ड्युलडेस्क खरेदी करण्यात आले

परभणी : मानव विकास मिशनच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ९६ लाख रुपये खर्च करुन १ हजार ९२६ ड्युलडेस्क खरेदी करण्यात आले आहेत. आणखी ४० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेने शेषमधून ड्युलडेस्क खरेदीसाठीच शिक्षण विभागाला उपलब्ध करुन दिला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे मिळावेत, यासाठी मानव विकास मिशनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जातो. जिल्ह्यातील नऊही तालुक्यात मानव विकास मिशनच्या योजना राबविल्या जाते. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ड्युलडेस्क खरेदी करण्यासाठी ९६ लाख ८ हजार ८१४ रुपयांच्या निधीची तरतूद मंजूर करण्यात आली होती. या तरतूदीनुसार चालू आर्थिक वर्षात निधी उपलब्ध झाल्यानंतर १ हजार ९२६ ड्युलडेस्क खरेदी करण्यात आले. त्यामध्ये परभणी तालुक्यात २७६ ड्युलडेस्कसाठी १३ लाख ७६ हजार ९६४ रुपये, सेलू तालुक्यातील २७५ ड्युलडेस्कसाठी १२ लाख ४७ हजार २५० रुपये, मानवत तालुक्यातील १७० ड्युलडेस्कसाठी ८ लाख ४८ हजार १३० रुपये, पाथरी तालुक्यातील १९० ड्युलडेस्कसाठी ८ लाख ९८ हजार २० रुपये, सोनपेठ तालुक्यातील १५५ ड्युलडेस्कसाठी ७ लाख ७३ हजार २९५ रुपये, गंगाखेड तालुक्यातील २२० ड्युलडेस्कसाठी १० लाख ९७ हजार ५८० रुपये, पालम तालुक्यातील २१० ड्युलडेस्कसाठी १० लाख ४७ हजार ६९० रुपये, पूर्णा तालुक्यातील २७० ड्युलडेस्कसाठी १३ लाख ४७ हजार ३० रुपये व जिंतूर तालुक्यातील १९५ ड्युलडेस्कसाठी ९ लाख ७२ हजार ८५५ रुपये खर्च करण्यात आले. ई- निविदेनुसार खरेदी करण्यात आलेले ड्युलडेस्क सर्व तालुक्यांमधील जिल्हा परिषद शाळांना वितरित करण्यात आले असल्याची माहिती जि. प. च्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी दिली. (प्रतिनिधी)