धक्कादायक ! तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, नंतर मृतदेहाचा कंबरेच्या खालील भाग जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 14:02 IST2022-01-21T14:01:40+5:302022-01-21T14:02:31+5:30
शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागील मैदानात मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

धक्कादायक ! तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, नंतर मृतदेहाचा कंबरेच्या खालील भाग जाळला
औरंगाबाद: टीव्ही सेंटर येथील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागे असलेल्या मैदानात एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. हत्या ऐवढी भीषण होती की, मारेकऱ्यांनी हत्येनंतर कंबरेच्या खाली मृतदेह जाळण्यात आला आहे. दरम्यान, सिद्धार्थ साळवे असे मृताचे नाव असल्याची माहिती आहे.
शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागील मैदानात मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची ओळख पटली असून त्याचे नाव सिद्धार्थ साळवे आहे. दारूच्या गर्तेत रात्री ही खुनाची घटना झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रथम दगडाने ठेचून आणि त्यानंतर कंबरेच्या खाली मृतदेह जाळण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.