धक्कादायक! चाव्या निखळलेल्या रुळावरून धावल्या रेल्वेगाड्या

By संतोष हिरेमठ | Updated: August 6, 2022 19:55 IST2022-08-06T19:45:49+5:302022-08-06T19:55:22+5:30

माहिती मिळताच चाव्या बसविण्यासाठी रेल्वेचा कर्मचारी दाखल झाले

Shocking! Trains ran on the track with the keys dislodged | धक्कादायक! चाव्या निखळलेल्या रुळावरून धावल्या रेल्वेगाड्या

धक्कादायक! चाव्या निखळलेल्या रुळावरून धावल्या रेल्वेगाड्या

औरंगाबाद : चाव्या निखळलेल्या रुळावरून रेल्वेगाड्या धावण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी औरंगाबादेत घडला. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. 

औरंगाबाद मेट्रो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत गोर्डे पाटील म्हणाले की, रेल्वे रुळाच्या परिसरात आमच्याकडून वेळोवेळी गस्त घातली जाते. कोणी आत्महत्या करण्यासाठी येत असेल त्याला त्यापासून परावृत्त केले जाते. आज रेल्वे रुळाच्या परिसरात पाहणी करताना अनेक चाव्या निघालेल्या आढळल्या. चाव्या नसताना त्यावरुन रेल्वे धावली. हा प्रकार रेल्वे अधिकाऱ्यांना कळविला. त्यानंतर चाव्या बसविण्यासाठी रेल्वेचा कर्मचारी दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. 

ट्रॅक पॅकिंगचे काम
रेल्वे रुळाच्या ट्रॅक पॅकिंगचे काम करण्यात आले. या कामासाठी रेल्वे रुळाच्या चाव्या काढव्या लागतात. त्यानंतर बसविण्यात आल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. दरम्यान, काही चाव्या बसविण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे अथवा बसविलेल्या चाव्या रेल्वेच्या गतीमुळे उचकटून बाहेर पडल्याची शक्यता वर्तविण्यात आली.

Web Title: Shocking! Trains ran on the track with the keys dislodged