धक्कादायक! शेतात ओढत नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 19:23 IST2022-05-28T19:23:21+5:302022-05-28T19:23:31+5:30
मुलीला बळजबरीने तोंड दाबून गायरान जमिनीकडे ओढत नेत केला अत्याचार

धक्कादायक! शेतात ओढत नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
लासूर स्टेशन (औरंगाबाद) : गवळीशिवरा परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर २१ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून एकाविरुद्ध शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अनिकेत ऊर्फ अन्या चव्हाण (२१, रा. गवळी शिवरा, ता. गंगापूर) असे आरोपीचे नाव असून, त्यास पोलिसांनी अटक केली.
गवळी शिवरा (ता. गंगापूर) येथील एक अल्पवयीन मुलगी शुक्रवारी पहाटे शेतशिवारात गेली असता, आरोपी अनिकेत ऊर्फ अन्या चव्हाण यांने त्या मुलीला बळजबरीने तोंड दाबून गायरान जमिनीकडे ओढत नेले. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी अनिकेत चव्हाणविरुद्ध शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.