धक्कादायक ! सातवीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 13:21 IST2021-03-02T13:16:06+5:302021-03-02T13:21:10+5:30
suicide of girl नेहमी हसत खेळत राहणारी संजवणीने आत्महत्यासारखा टोकाचा पाऊल एवढ्या कमी वयात का उचलले याचे कारण समोर आले नाही.

धक्कादायक ! सातवीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन संपविले जीवन
औरंगाबाद : सातवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर साडीने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री गारखेडा परिसरातील आनंदनगरात घडली. याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संजीवनी उर्फ दीपाली एकनाथ घेणे (रा.गल्ली क्र.4 आनंदनगर, गरखेडा परिसर) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.
गारखेडा परिसरात राहणारी संजीवनीचे आई-वडील दोन्ही चणे - फुटाणे विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे तिचे आई वडील आणि लहान भाऊ एकत्रित व्यवसायासाठी काल घराबाहेर पडले होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते घरी आले असता. घराचा बाहेरील दरवाजा आतून बंद होता. आवाज दिला असता तीने प्रतिसाद दिला नाही. लहान भाऊ जेंव्हा घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत गेला तेंव्हा संजीवणीने साडीच्या साहाय्याने छताच्या लोखंडी अंगलला गळफास घेतल्याचे त्याला दिसले. त्याने भेदरलेल्या अवस्थेत ही माहिती आई वडिलांना सांगितली. यानंतर नातेवाईकांनी आरडाओरड केल्यावर शेजारी जमा झाले, त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी संजीवणीला फासावरून खाली उतरवत घाटी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
नेहमी हसत खेळत राहणारी संजवणीने आत्महत्यासारखा टोकाचा पाऊल एवढ्या कमी वयात का उचलले याचे कारण समोर आले नाही. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरिक्षक मीरा चव्हाण करीत आहेत..