नाईट ड्यूटीवरून परतताच घरात संतापजनक दृश्य; मेहुण्याने भावजीला संपवले, पत्नीवरही हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:24 IST2025-10-20T12:15:21+5:302025-10-20T12:24:32+5:30
उस्मानपुरा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

नाईट ड्यूटीवरून परतताच घरात संतापजनक दृश्य; मेहुण्याने भावजीला संपवले, पत्नीवरही हल्ला
छत्रपती संभाजीनगर : नाईट ड्यूटी करून सकाळी घरी आल्यानंतर भावजीला घरात पाहताच मेहुण्याने डोक्यात लोखंडी पकडीने घाव घालून भावजीची निर्घृण हत्या केली. पत्नीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना रविवारी (दि. १९) सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान उस्मानपुरा भागात घडली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उस्मानपुरा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी दिली.
संतोष काशिनाथ खाजेकर (३८, रा. म्हाडा कॉलनी, ता. गंगापूर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे तर बळीराम कल्याण जगधने (रा. रांजणगाव शेणपुंजी, एमआयडीसी वाळूज, ह. मु. उस्मानपुरा) असे आराेपी मेहुण्याचे नाव आहे. उस्मानपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संतोष यांच्या मुलाने तक्रार दिली आहे. त्यानुसार मृत संतोष हे मेहुणा रात्री ड्यूटीवर गेल्यानंतर त्याच्या घरी मुक्कामी गेले सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक आरोपी बळीराम ड्यूटीवरून घरी आला. तेव्हा मृत संतोष हे टेबलखाली लपले. मात्र, बळीरामला ते दिसल्याने त्याचा राग अनावर झाला. त्याने संतोषला धक्काबुक्की करून खाली पाडले. लोखंडी पक्कडने त्यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपीने पत्नीवरही हल्ला करून सायकलने डोक्यात मारून ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेची माहिती आरोपीच्या पत्नीने मृताच्या मुलाला दिली. त्यानुसार मुलाने मामाचे घर गाठले. त्याठिकाणी वडील रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उस्मानपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी संतोष यांना तत्काळ घाटीत