धक्कादायक ! विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोमिओचा मुख्याध्यापक व सेवकावर तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 16:56 IST2022-02-04T16:55:51+5:302022-02-04T16:56:06+5:30

तलवारीने हल्ला केल्यानंतर आरोपी तरुण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

Shocking! Romeo attacks headmaster and servant with a sword in Kannad | धक्कादायक ! विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोमिओचा मुख्याध्यापक व सेवकावर तलवारीने हल्ला

धक्कादायक ! विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोमिओचा मुख्याध्यापक व सेवकावर तलवारीने हल्ला

कन्नड ( औरंगाबाद ) : विद्यार्थिनींची छेड काढण्यापासून रोखले असता माथेफिरू तरुणाने शाळेचे मुख्याध्यापक आणि सेवकावर तलवारीने हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडली. कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला. हल्ल्यात जखमी मुख्याध्यापक आणि सेवकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मकरनपूर येथील मजीद शेख जमील हा कन्नड येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय परिसरात संशयास्पद रित्या फिरत होता. तो विद्यालयाच्या परिसरातील विद्यार्थिनींची छेड काढत असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब चव्हाण यांना मिळाली. यामुळे मुख्याध्यापक चव्हाण हे सेवक संतोष जाधवसह मजीद शेख जमील याला समजाविण्यासाठी गेले. यावेळी संतप्त झालेल्या मजीदने त्यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. यात मुख्याध्यापक चव्हाण आणि सेवक जाधव जखमी झाले. हल्ल्यानंतर मजीद फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  
 

Web Title: Shocking! Romeo attacks headmaster and servant with a sword in Kannad