शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

माजी सरपंचाच्या मुलाच्या खुनाचा धक्कादायक उलगडा; माय-लेकाची दृश्यम स्टाईल प्लॅनिंग फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:07 IST

राजकीय वैमनस्य नव्हतं, तर कारण काही वेगळंच!; 'दृश्यम','क्राइम पेट्रोल' पाहून माय-लेकाने रचला खुनाचा कट

कन्नड (छत्रपती संभाजीनगर): कन्नड तालुक्यातील जामडी फॉरेस्ट शिवारात १३ जानेवारी रोजी झालेल्या राजू रामचंद्र पवार (वय ४५) यांच्या खुनाचा तपास लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सुरुवातीला ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज होता, मात्र सखोल तपासात ही हत्या वंदना पवार आणि तिचा मुलगा धीरज ऊर्फ टेमा या दोघांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. शारीरिक संबंधांच्या मागणीला कंटाळून हा कट रचल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

काय आहे नेमकी घटना?राजू पवार यांचा मृतदेह १३ जानेवारी रोजी जामडी शिवारातील वनभागात आढळला होता. राजू पवार यांचे वडील माजी सरपंच होते आणि सध्या त्यांच्या काकू गावाच्या सरपंच आहेत. त्यामुळे या हत्येचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले होते. मात्र, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने संशयावरून वंदना पवार हिची विचारपूस केली. सुरुवातीला माहिती लपवणाऱ्या वंदना हिने विश्वासात घेतल्यानंतर खुनाची कबुली दिली.

'दृश्यम' स्टाईलने रचला कटवंदना हिने दिलेल्या माहितीनुसार, मयत राजू पवार तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी करत होता. या त्रासाला कंटाळून तिने मुलगा धीरजला सर्व हकीकत सांगितली व त्याला ठार मारण्याचा कट रचला. १३ जानेवारी रोजी सकाळी वंदनाने राजूला शेतात भेटायला बोलावले. तो तिथे येताच धीरजने त्याच्या डोक्यात प्रहार केला आणि वंदनाने त्याचे गुप्तांग दाबून त्याला ठार मारले.

पोलिसांची चकवणूक करण्याचा प्रयत्नआरोपींनी 'दृश्यम' चित्रपट आणि 'क्राइम पेट्रोल' मालिका पाहून पुरावा नष्ट करण्याचे नियोजन केले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी मृतदेहापासून काही अंतरावर विरुद्ध दिशेला राजूचा मोबाईल फोडून टाकला आणि चपलाही फेकून दिल्या. मृतदेह वनविभागाच्या दाट झाडीत नेऊन एका झाडाच्या मुळाखाली पाण्यात लपवला होता.

बंजारा भाषेतून मिळाला सुगावाया तपासात पोलिसांना मोठी अडचण येत होती. अखेर पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी बंजारा भाषा अवगत असणाऱ्या व्यक्ती आणि महिलांची गुप्तपणे गावात नेमणूक केली. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार वंदना पवारवर संशय बळावला आणि अवघ्या आठ दिवसांत पोलिसांनी या क्लिष्ट गुन्ह्याचा उलगडा केला.

यांनी केली कारवाईही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह, सहायक पोलीस अधिक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, स.पो.नि. पवन इंगळे, स.पो.नि. सुधीर मोटे, उपनि महेश घुगे, पोह/विष्णु गायकवाड, रवि लोखंडे, प्रमोद पाटील, अशोक वाघ, शिवानंद बनगे, सुनिल गोरे, सचिन राठोड, दीपक सूरोसे, जनाबाई चव्हाण, पो. अमलदार महेश बिरुटे, अनिल काळे, बलविरसिंग बहुरे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, गणेश घोरपडे, राजेश राठोड, संजय तांदळे, नीलेश कुडे, शिवानी मगर तसेच पो.स्टे. कन्नड ग्रामीणचे स.पो.नि. रामचंद्र पवार, पो. उपनि. अमोल जाधव, पोह अजय मोतिंगे,पोह/कैलास करवंदे, धिरज चव्हाण, लक्ष्मण गवळी, दिलवरसिंग वसावे, बाबासाहेब धनुरे. सविता सोनवणे, मोनिका सिरसाठ यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Shocking Murder Solved: Mother-Son's 'Drishyam' Plot Fails in Kannad

Web Summary : A mother and son were arrested for murdering a former village head's son in Kannad. They confessed to the crime, claiming the victim harassed the mother with unwanted advances. The duo unsuccessfully attempted to cover up the murder, inspired by the movie 'Drishyam'.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी