धक्कादायक! मानसिक रुग्ण पत्नीने झोपेतच केली पतीची हत्या, मृतदेह टाकला हौदात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:14 IST2025-03-19T13:13:10+5:302025-03-19T13:14:27+5:30

अपत्य होत नसल्याने उडायचे खटके; संतापलेल्या पत्नीच्या कृत्याने सर्वांना धक्का

Shocking! Mentally ill wife kills husband in his sleep, throws body into a well | धक्कादायक! मानसिक रुग्ण पत्नीने झोपेतच केली पतीची हत्या, मृतदेह टाकला हौदात

धक्कादायक! मानसिक रुग्ण पत्नीने झोपेतच केली पतीची हत्या, मृतदेह टाकला हौदात

लासूरस्टेशन: अखेर लासूर स्टेशनच्या निवृत्त शिक्षकाच्या खुनाची वाचा फुटली. मुलबाळ होत नाही म्हणून नवऱ्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याची बायकोने कबुली दिली. शिल्लेगाव पोलीसांनी अवघ्या पाच दिवसात फोडली खुनाला वाचा मनोरुग्न पत्नीला बेड्या ठोकल्या.

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील डोणगाव रोडवरील हनुमान मंदिर येथील सेवानिवृत्त शिक्षक पमुसिंग छगनसिंगग पपैया (६४) हे दि १३ मार्चंला राहत्या घरी पाण्याच्या हौदात पडले व त्यात त्यांचा करून अंत झाला होता. दरम्यान, त्या शिक्षकांचा अपघाती मृत्यू हौदात पडून झाला की खून झाला याबाबत गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. मात्र, शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश खटाणे, पो.कॉ. हनुमंत सातपुते, अर्जुन तायडे यांनी निवृत्त शिक्षकाचा खून झाल्याचे उघड केले. अवघ्या पाच दिवसांत हा अपघात नाही तर खून असल्याचे तपासात पुढे आले.

खून करून मृतदेह हौदात फेकला
संशयाची सुई मानसिक रुग्ण असलेल्या पत्नीभोवती फिरत होती. अखेर शिल्लेगाव पोलिसांनी मृताची पत्नी भारती पमुसिंग पपैया (५१) हिस चौकशीसाठी ताब्यात घेतले. भारती यांनी नवऱ्याच्या खुनाची कबुली दिली. लग्न झाल्यापासून मुलबाळ होत नव्हते. त्यामुळे आमच्यात कायम खटके उडायचे, सतत भांडण व्हायचे.  १३ मार्च रोजी देखील आमच्यात झाले. रात्री पलंगावर झोपेत असलेल्या नवऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर मृतदेह घरातच असलेल्या पाण्याच्या हौदात ओढत नेऊन टाकला, अशी माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Shocking! Mentally ill wife kills husband in his sleep, throws body into a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.