शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

धक्कादायक ! अकरावी उत्तीर्ण शेकडो विद्यार्थ्यांचे बारावीसाठी गावाकडे चला अभियान

By राम शिनगारे | Updated: June 25, 2024 20:01 IST

बारावी ग्रामीण भागात करण्याचा इरादा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची शिक्षण उपसंचालकांकडे धाव

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये प्रवेश न घेताच टीसी काढण्यासाठी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागांमध्ये बारावीसाठी प्रवेश घ्यायचा असल्यामुळे अर्ज केल्याचा दावा कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रशासकांनी केला आहे.

अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी शहरातील विद्यार्थ्यांची ग्रामीण भागांमध्ये झुंबड उडाली आहे. या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात प्रवेश घेतल्यानंतर एकदाही वर्गात जाण्याची गरज नसते. त्याशिवाय पैकीच्या पैकी घरबसल्या प्रात्याक्षिकांचे मार्क मिळतात. परीक्षेच्या काळात मुक्त हस्ते कॉपी करण्यास मिळते. त्याउलट परिस्थिती शहरातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असते. विद्यार्थ्यांना वर्गात यावे लागते. प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागते. त्यात पैकीच्या पैकी मार्क मिळत नाहीत. शहरातील परीक्षा केंद्रांवर कॉपी करता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात प्रवेशासाठी विद्यार्थी प्राधान्य देत आहेत. त्याठिकाणी प्रवेश घेऊन शहरांमध्ये विविध क्लासेसला अभ्यास करतात. मात्र, त्याचा परिणाम शहरातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये होत आहे. त्यामुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील, सचिव प्रा. गणेश शिंदे, देवगिरीचे उपप्राचार्य प्रा. सुरेश लिपाने, प्रा. नंदकिशोर गायकवाड, स.भु. विज्ञानचे प्रा. संजय गायकवाड, विवेकानंदचे प्रा. प्रदीप पाटील, मौलाना आझादचे प्रा. रशीद खान, छत्रपती महाविद्यालयाचे प्रा. भरत वहाटुळे, वसंतराव नाईकचे प्रा. एस.बी चव्हाण, डॉ. भारत खैरनार आणि भारत साेनवणे यांनी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांची भेट घेऊन ११ वी उत्तीर्णतेचे टीसी मागणाऱ्या विद्यार्थ्यांना पायबंद घालण्याची मागणी केली आहे.

७० शिक्षक झाले अतिरिक्तजिल्ह्यात अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ९५ एवढी आहे. त्यातील ४० कनिष्ठ महाविद्यालये छत्रपती संभाजीनगर शहरात आहेत. या महाविद्यालयात ६५० शिक्षक कार्यरत होते. त्यापैकी मागील वर्षी विद्यार्थी संख्या घटल्यामुळे ७० शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यात एकट्या स. भू. कनिष्ठ महाविद्यालयातील २० शिक्षकांचा समावेश आहे.

२५० पेक्षा अधिक स्वयंअर्थसहाय्यीत कनिष्ठ महाविद्यालयेजिल्ह्यात २५० पेक्षा अधिक स्वयं अर्थसहाय्यीत उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यात १५० शहरांत आहेत. या महाविद्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. शिक्षकांच्या नेमणुका केलेल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांची प्रचंड तूट असल्याचे वारंवार समोर येत आहे.

अकरावी उत्तीर्णतेच्या टीसीसाठी विद्यार्थ्यांचे अर्जमहाविद्यालय..........................अर्जांची संख्यादेवगिरी.....................................५००विवेकानंद..................................२००स.भू.विज्ञान................................१००मौलाना आझाद...........................१५०मिलिंद विज्ञान...............................७०छत्रपती कॉलेज ........................................१५०वसंतराव नाईक............................ ८०डॉ.आंबेडकर वाणिज्य....................४०मिलिंद कला..................................७०

क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिल्यास कारवाईग्रामीण भागामध्ये असलेल्या उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय मंडळाच्या पातळीवर परीक्षेसाठी तालुका पातळीवरीलच केंद्र देण्याविषयी विचार सुरू आहे तसेच महाविद्यालयांनी विनाकारण अकरावीचा टीसी मागणाऱ्यांना टीसी देऊ नये.- अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय