धक्कादायक! बिडकीनमध्ये पोलिसांवर जमावाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 22:55 IST2020-04-27T22:51:26+5:302020-04-27T22:55:05+5:30
जमवला हटकल्यावरून झाला हल्ला

धक्कादायक! बिडकीनमध्ये पोलिसांवर जमावाचा हल्ला
ठळक मुद्देजमावाने थेट हल्ला चढवत दगडफेक केली
औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये प्राथनास्थळी जमा झालेल्या लोकांना हटकल्यावरून पोलिसांवरच हल्ला केल्याची खळबळजनक घटना बिडकीनमध्ये घडली. यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत.
बिडकीन येथील औरंगाबाद-पैठण रोडवरील प्रकाश नगरमध्ये एका प्राथनास्थळी जमाव जमल्याची माहिती बिडकीन पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी जाऊन विचारपूस करत असतानाच जमावाने थेट हल्ला चढवत दगडफेक सुरू केली. यात पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील,सहायक फौजदार बाबासाहेब दिलवाले,पोलीस नाईक सोनवणे मेजर जखमी झाले आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.