धक्कादायक! वृद्धाची राहत्या घरात भोसकून हत्या; पाठ, पोटावर क्रूरतेने वार

By सुमित डोळे | Published: April 16, 2024 03:13 PM2024-04-16T15:13:33+5:302024-04-16T15:14:57+5:30

महावितरणमधून सेवानिवृत्त झालेले पाटील सातारा परिसरातील चाटे स्कूल परिसरात कुटुंबासह राहत

Shocking! 62-year-old man stabbed to death in Satara area; Brutally stabbed on the back, stomach | धक्कादायक! वृद्धाची राहत्या घरात भोसकून हत्या; पाठ, पोटावर क्रूरतेने वार

धक्कादायक! वृद्धाची राहत्या घरात भोसकून हत्या; पाठ, पोटावर क्रूरतेने वार

छत्रपती संभाजीनगर :  सातारा परिसरात ६२ वर्षीय वृद्धाची क्रूर हत्या झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ७.३० वाजता निदर्शनास आली. श्रीकृष्ण वामन पाटील असे हत्या झालेल्या वृध्दाचे नाव आहे. 

महावितरणमधून सेवानिवृत्त झालेले पाटील सातारा परिसरातील चाटे स्कूल परिसरात सिल्व्हर रेसिडेन्सीमध्ये पत्नी, मुलगा व लहान मुलीसह वास्तव्यास होते. सोमवारी कुटुंबासोबत जेवण करून सर्व सदस्य झोपी गेले. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मात्र पाटील धक्कादायकरीत्या घरात मृतावस्थेत आढळले. सातारा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपायुक्त नवनीत काँवत, सहायक आयुक्त डॉ. रणजित पाटील, गुन्हे शाखेचे संदीप गुरमे, सहायक निरीक्षक काशिनाथ महांडूळे, साताऱ्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी, उपनिरीक्षक दिलीप बचाटे, अमोल कामठे, नंदकुमार भंडारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पाटील यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांच्या पोट व पाठीवर टोकदार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले. पाटील यांचा मृतदेह घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाकडे पाठवण्यात आला. 

गंभीर प्रश्न उपस्थित, तपास सुरू
चार खोल्यांच्या रोहाऊसमध्ये पाटील यांचे कुटुंब राहते. त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले आहे. पत्नी, मुलगा, मुलगी घरात असताना पाटील यांची हत्या झाली कशी? कोणालाच त्यांच्या ओरडण्याचा आवाज कसा आला नाही? असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी तत्काळ पाटील यांच्या जवळच्या नातेवाईकांना ताब्यात कसून चौकशी सुरू केली. सायंकाळ पर्यंत घटनेचा उलगडा होईल, असेही सातारा पोलिसांनी स्पष्ट केले. 

Web Title: Shocking! 62-year-old man stabbed to death in Satara area; Brutally stabbed on the back, stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.