औरंगाबादमध्ये ७ जणांच्या पत्त्यावर आल्या ३७ तलवारी; कुरियर कार्यालयावर पोलिसांचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 13:53 IST2022-03-30T13:51:29+5:302022-03-30T13:53:30+5:30

पोलिसांनी कुरिअर कार्यालयात पाहणी केली असता पार्सल बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर तलवारीचा साठा आढळून आला.

Shocking! 37 swords arrives on 7 persons address in Aurangabad; Police raid on courier office | औरंगाबादमध्ये ७ जणांच्या पत्त्यावर आल्या ३७ तलवारी; कुरियर कार्यालयावर पोलिसांचा छापा

औरंगाबादमध्ये ७ जणांच्या पत्त्यावर आल्या ३७ तलवारी; कुरियर कार्यालयावर पोलिसांचा छापा

औरंगाबाद: शहरात पुन्हा एकदा कुरियरने तलवारी मागविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. आज सकाळी क्रांती चौक पोलिसांनी निराला बाजार येथील डीटीडीसी कुरिअरवर छापा मारत पार्सल बॉक्समध्ये एक कुकरी आणि ३७ तलवारी जप्त केल्या. शहरात कुरिअरने तलवारी मागविण्याची ही तिसरी घटना आहे. विशेष म्हणजे, औरंगाबाद आणि जालना येथील ७ ग्राहकांचे पत्ते या पार्सलवर आढळून आले आहेत.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, सहायक पोलिस आयुक्त (शहर विभाग) अशोक थोरात यांना खबऱ्या मार्फत कुरिअरने शहरात तलवारी आल्याची माहिती मिळाली. यावरून क्रांती चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे, उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने निराला बाजार येथील डीटीडीसी कुरिअरच्या कार्यालयावर छापा टाकला. तेथील व्यवस्थापक वाल्मिक जोगदंड यास माहिती विचारली असता, असे कोणतेही पार्सल आले नसल्याचे सांगितले. 

त्यानंतर पोलिसांनी कार्यालयात पाहणी केली असता पार्सल बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर तलवारीचा साठा आढळून आला. एकूण सात ग्राहकांनी या तलवारी मागवल्या होत्या. यात पाच औरंगाबादचे असून दोघे जालन्याचे आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक डॉ. दराडे यांनी दिली.

Web Title: Shocking! 37 swords arrives on 7 persons address in Aurangabad; Police raid on courier office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.