शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने ‘हद्द’ ओलांडली...!

By admin | Updated: September 15, 2015 00:37 IST

औरंगाबाद : झालर क्षेत्रातील २८ पैकी २६ गावे मनपा हद्दीत समाविष्ट करण्याचा अशासकीय प्रस्ताव सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता.

औरंगाबाद : झालर क्षेत्रातील २८ पैकी २६ गावे मनपा हद्दीत समाविष्ट करण्याचा अशासकीय प्रस्ताव सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत सभा सुरू असताना या प्रस्तावाला भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि एमआयएम या पक्षांनी कडाडून विरोध दर्शविला. सर्व राजकीय पक्षांचा विरोध झुगारून शिवसेनेने ठराव मंजूर केला.दोन दिवसांपूर्वीच महापौर त्र्यंबक तुपे यांनी झालर क्षेत्रातील २६ गावे मनपा हद्दीत समाविष्ट करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे केली होती. ही मागणी शासन दरबारी पोहोचेपर्यंत महापौरांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत ऐनवेळी झालरच्या २६ गावांचा अशासकीय प्रस्तावही आणला. या प्रस्तावावर रात्री उशिरा सभेत जोरदार चर्चा झाली. सेनेचे नगरसेवक राजू वैद्य यांनी झालरच्या २६ गावांसोबत वाळूज एमआयडीसीही मनपात घ्यावी. जेणेकरून मनपाला आर्थिक लाभ मिळेल. भाजपचे स्थायी समितीचे माजी सभापती राजू शिंदे यांनी प्रस्तावाची अक्षरश: चिरफाड केली. सिडकोसारख्या व्यावसायिक संस्थेलाही झालरचा विकास परवडत नाही. शहरातील ११३ वॉर्डांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आजही मनपा मूलभूत सोयी-सुविधा देऊ शकत नाही. ज्या नागरिकांनी आपल्याला निवडून दिले आहे, त्यांच्यावर अन्याय करणारा हा प्रस्ताव आहे. झालरचा विकास डीएमआयसीत करावा. मनपा हद्दीत या गावांना घेतल्यास २० बाय ३० सारखी बकाल अवस्था होईल. काँग्रेसचे नगरसेवक भाऊसाहेब जगताप, एमआयएमचे अब्दुल रहीम नाईकवाडी, गजानन बारवाल यांनी कडाडून विरोध केला. सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी २६ गावांच्या विकासासाठी मनपाकडे काही ब्ल्यू प्रिंट आहे का, अशी विचारणा केली. त्याचे प्रेझेंटेशन सभागृहात दाखविण्यात यावे. तत्पूर्वी हा विषय मंजूर करण्यास आपण अनुमोदन देत असल्याचे सांगितले. महापौरांनी एकतर्फी निर्णय घेत ठरावाला मंजुरी दिली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर येऊन विरोधही केला. मात्र, काहीच उपयोग झाला नाही.झालर क्षेत्रात शहरातील अनेक व्यावसायिकांनी जागा घेऊन ठेवल्या आहेत. ही गावे मनपा हद्दीत नसल्यामुळे गृह व्यावसायिकांना मागील काही दिवसांपासून त्रास सहन करावा लागत आहे. ४झालरमधील गावे एकदा मनपा हद्दीत आल्यास जमिनींच्या कि मती आकाशाला गवसणी घालतील. गृहप्रकल्पांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. झालरमध्ये राहणाऱ्या नागरिकांबद्दल मनपाला किंचितही सहानुभूती नाही. ४व्यावसायिकांचा फायदा लक्षात घेऊन हा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे काही नगरसेवकांनी सांगितले.