शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शिवराय ते भीमराय सद्भावना रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:49 IST

‘भिंत पाडा द्वेषाची.... इमारत बांधा प्रेमाची,’ असा संदेश देण्यासाठी आज औरंगाबादेत शिवराय ते भीमराय सद्भावना मूक रॅली काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोरेगाव-भीमा येथील १ जानेवारीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ अमलात आणा,’ असे देवेंद्र फडणवीस यांना बजावण्यासाठी व ‘भिंत पाडा द्वेषाची.... इमारत बांधा प्रेमाची,’ असा संदेश देण्यासाठी आज औरंगाबादेत शिवराय ते भीमराय सद्भावना मूक रॅली काढण्यात आली. भगवे, निळे, हिरवे, पिवळे व लाल रंगाचे झेंडे या निमित्ताने एकत्र डौलाने फडकताना दिसून आले.दुपारी मुलींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर या शिस्तबद्ध रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीच्या अग्रभागी हातात घोषफलक घेऊन महिला चालत होत्या. कॉ. बुद्धप्रिय कबीर यांच्या हातात तिरंगा ध्वज होता, तर प्रा. माणिक सावंत हे व्हीलचेअरवर बसून ‘कृपया समाजात आग लावू नका, कदाचित ही आग तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकते,’ असा संदेश देत होते. रॅलीच्या अग्रभागी बुद्ध ते मौलाना आझाद यांच्यापर्यंतच्या महामानवांच्या प्रतिमांचे भलेमोठे बॅनर धरून महिला चालत होत्या.एका वाहनात बसून अ‍ॅड. रमेशभाई खंडागळे हे ध्वनिक्षेपकावरून योग्य त्या सूचना देत होते. रॅलीत संभाजी ब्रिगेड, जमात- ए- इस्लामी, तंजीम- ए- इन्साफ, बळीराजा शेतकरी संघटना, बसपा, भीमशक्ती, भारिप-बहुजन महासंघ, राष्टÑीय मराठा महासंघ, स्वाभिमानी अ.भा. छावा, अ.भा. शिवक्रांती संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सिटू, आयटक, एसएफआय, एआयवायएफ, अ.भा. छावा, शिवप्रहार, स्वराज इंडिया, संभाजी सेना, मूलनिवासी संघ, फुले- शाहू- आंबेडकर विचार प्रबोधन परिषद, छावा, बुलंद छावा, मराठा सेवा संघ, दलित अत्याचार विरोधी कृती समिती, रिपाइं गवई गट, भीम आर्मी, मुप्टा, बामसेफ, महात्मा फुले युवा दल, जनता दल सेक्युलर, जिवा सेना, एसआयओ, समता विद्यार्थी आघाडी, बीआरपी, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन, भीमशक्ती कर्मचारी युनियन, सत्यशोधक समाज, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, महाराष्टÑ क्रांती सेना आदी पक्ष, संघटना, संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रॅलीत सहभाग घेतला.रॅलीत अत्यंत बोलके फलक झळकत होते.‘ हे राज्य आहे शिवरायांचे, फुले- शाहू- भीमरायांचे’, ‘फडणवीस राजीनामा द्या’, ‘आम्हा सर्वांचे पूर्वज एक, मानव आम्ही सर्व एक’, ‘संभाजी भिडे... मिलिंद एकबोटेचे उदात्तीकरण बंद करा’, ‘आम्हीच येथे जातीयतेचे तोडू सारे बंधन, नको विषमता, हवी सुखशांती’ यासारख्या घोषवाक्यांतून योग्य संदेश दिले जात होते.क्रांतीचौक, नूतन कॉलनी, पैठणगेट, टिळक पथ, गुलमंडी, औरंगपुरा, खडकेश्वर, मिल कॉर्नर, ज्युबिलीपार्कमार्गे भडकलगेटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ही रॅली आली. तेथे सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कोरेगाव-भीमाच्या दंगलीमुळे मृत झालेल्यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वाती नखाते या मुलीने मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहिलेले निवेदन वाचून दाखवले. त्यानंतर राष्टÑगीत होऊन रॅलीची सांगता झाली. कॉ. राम बाहेती यांनी सूत्रसंचालन केले.कॉ. मनोहर टाकसाळ, प्र.ज. निकम गुरुजी, गंगाधर गाडे, सूर्यकांता गाडे, अ‍ॅड. अंकुश भालेकर, पृथ्वीराज पवार, कदीर मौलाना, के.ई. हरिदास, कॉ. भीमराव बनसोड, कॉ. पंडित मुंडे, कॉ. बुद्धिनाथ बराळ, कॉ. उद्धव भवलकर, दिनकर ओंकार, रतनकुमार पंडागळे, गौतम लांडगे, अ‍ॅड. जे.के. नारायणे, श्रीरंग ससाणे, किशोर म्हस्के, उत्तम शिंदे, तनुजा जोशी, योगेश खोसरे, मंगल ठोंबरे, मंगल खिंवसरा, कॉ. अभय टाकसाळ, साथी सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, इंजि. वाजीद कादरी, एस.जी. शुत्तारी, नासेर नदवी, साजीद मौलाना, कॉ. सांडू जाधव, तारा बनसोडे, माया भिवसने, मनीषा भोळे, सोनाली म्हस्के, साळूबाई दांडगे, जयश्री शिर्के, भावना खोब्रागडे, निर्मला साळवे, पंचशीला साळवे, अर्चना बामणे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत समाविष्ट झाले होते.