शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

भाजपला ठाकरे गटाचा दणका; आमदार प्रशांत बंब यांच्यासह संपूर्ण पॅनल पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 1:23 PM

गंगापूर साखर कारखाना निवडणुकीत ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर गटाचा एकतर्फी विजय

गंगापूर (औरंगाबाद) : तालुक्याचे वैभव असलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपचे आमदार व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत बंब यांना सभासदांनी नाकारत सत्तांतराचा कौल दिला. शिवसेना ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या गटाने निवडणूक झालेल्या सर्व २० जागांवर दणदणीत विजय मिळविला. आमदार प्रशांत बंब यांचादेखील पराभव झाला आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून बंद असलेल्या गंगापूर कारखाना निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. भाजपचे आमदार तथा कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सभासद कामगार पॅनल व कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवसेनेचे (ठाकरे गट) कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखालील शिवशाही शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळ लढत झाली. यात आमदार बंब यांच्या पॅनलला खातेही उघडता आले नाही. सभासदांनी बंब यांच्या पॅनलचा सुपडा साफ करीत कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या पॅनलवर विश्वास दाखवला. नोव्हेंबर २०२० मध्ये कारखाना अध्यक्ष आ. बंब यांच्यासह विद्यमान संचालक मंडळावर भ्रष्टाचाराच्या आरोपातून गुन्हे दाखल झाल्याने मध्यंतरी कारखाना राज्यभर गाजला होता. यामुळे या कारखाना निवडणुकीकडे तालुक्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. एकूण १४ हजार ६६ सभासदांपैकी ७ हजार ५९८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पैकी डोणगावकर यांच्या पॅनलने सर्व जागांवर ९०० पेक्षा अधिक मताच्या फरकाने विजय मिळवला. कारखान्याचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब गावंडे व पॅनल प्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर यांनी अनुक्रमे ४ हजार २१० व ४ हजार २०५ अशी सर्वाधिक मत मिळवली. पराभूत पॅनलचे प्रमुख आमदार प्रशांत बंब यांचा ऊस उत्पादक मतदारसंघ लासूर गटातून ९५५ मतांनी पराभव झाला.

विजयी संचालक पुढीलप्रमाणेकृष्णा पाटील, सुरेश मनाळ, प्रवीण वालतुरे, कचरू शिंदे, तुकाराम कुंजर, शेषराव पाटेकर, दिलीप बनकर, माया दारुंटे, शोभाबाई भोसले, काशीनाथ गजहंस, बाबूलाल शेख, मधुकर साळुंखे, शेषराव साळुंखे, कारभारी गायके, दादासाहेब जगताप, अप्पासाहेब गावंडे, मनोहर दुबिले, प्रल्हाद निरपळ, नामदेव दारुंटे, देवचंद राजपूत.

कारखाना चालू झाल्यानंतरच सत्कार स्वीकारणारही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. तरीदेखील शेतकरी कोणत्याही आमिषाला बळी न पडता कारखाना सुरू करण्यासाठी आमच्या पाठीशी राहिले. त्यामुळे हा विजय सर्वसामान्य शेतकऱ्यांचा असून, ही तालुक्यातील परिवर्तनाची नांदी आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना सुरू करण्यासाठी आमच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ देणार नाही. जोपर्यंत कारखाना सुरू करणार नाही तोपर्यंत विजयी सत्कारदेखील स्वीकारणार नाही.- कृष्णा पाटील डोणगावकर, विजयी पॅनलचे प्रमुख

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाPrashant Bambप्रशांत बंबShiv Senaशिवसेना