धारदार शस्त्राने पत्नीचा खून करून प्रेत नाल्यात टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 19:30 IST2018-09-25T19:28:49+5:302018-09-25T19:30:28+5:30

४५ वर्षीय महिलेचा पतीने  धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना आज पहाटे उघडकीस आली.

The sharp weapon killed his wife and put her dead body in the nallah | धारदार शस्त्राने पत्नीचा खून करून प्रेत नाल्यात टाकले

धारदार शस्त्राने पत्नीचा खून करून प्रेत नाल्यात टाकले

औरंगाबाद: मुकुंदवाडी परिसरातील महालक्ष्मी चौकात एका ४५ वर्षीय महिलेचा पतीने  धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना आज पहाटे उघडकीस आली. ज्योती बाळासाहेब शिंदे (४६, रा.महालक्ष्मी चौक मुकुंदवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. 

ज्योती या नर्स म्हणून कार्य करत असत. तसेच त्यांचा पती एका दवाखान्यात सुरक्षा रक्षक असल्याचे समजते. महालक्ष्मी चौक येथे ते वैभव व ओम या मुलांसह राहतात. सोमवारी संध्याकाळी पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी वैभव व ओम या दोघां मुलांनी त्यांचे भांडण मिटविले. यानंतर वैभव हा मित्राकडे झोपण्यासाठी निघून गेला.मात्र, रात्री पुन्हा पती-पत्नीत भांडण सुरू झाले.

यावेळी बाळासाहेब याने पत्नीचा गळा दाबत मारहाण केली. तसेच त्याने तिच्या पोटात धारदार शस्त्राने वार केला. याच अवस्थेत त्याने ज्योतीला समोरच्या नाल्यात ढकलून दिले व तो स्कुटरवरून फरार झाला. हा सर्व प्रकार ओमने पाहिला असता त्याने आरडाओरडा केला. दरम्यान, पोलिसांच्या गस्ती पथकाची गाडी परिसरात आली. त्यांनी ज्योतीला शासकीय दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी तीला तपासून मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राहुल भदर्गे करत आहेत.

Web Title: The sharp weapon killed his wife and put her dead body in the nallah