शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद खानने मित्राकडे ठेवलेली दुचाकी जप्त

By admin | Updated: August 2, 2016 00:27 IST

औरंगाबाद : परभणी येथून स्फोटकाच्या साठ्यासह दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या शाहिद खान याचे औरंगाबादशी जवळचे नाते आहे.

औरंगाबाद : परभणी येथून स्फोटकाच्या साठ्यासह दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या शाहिद खान याचे औरंगाबादशी जवळचे नाते आहे. तो एका मोबाईल कंपनीत तीन ते चार वर्षे कार्यरत होता. त्यावेळी त्याचे येथील एका जणासोबत चांगलीच मैैत्री झालेली आहे. या मित्राकडे त्याने चुकीचा क्रमांक असलेली दुचाकी आणून ठेवल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे शाहिदला अटक झाल्याचे समजताच त्याच्या या मित्राने तात्काळ पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या दुचाकीची माहिती त्यांना दिली. याविषयी प्राप्त माहिती अशी की, इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या परभणी येथील अन्सारबीन चाऊस यास १४ जुलैै रोजी एटीएसने परभणी येथून उचलले. त्यानंतर त्याचा दुसरा साथीदार शाहिद खान यासही एटीएसने परभणी येथेच पकडले. त्यावेळी त्याच्याकडून आयईडी या स्फोटकाचा मोठा साठा हस्तगत केला. शिवाय दोन जिवंत बॉम्बही त्याच्याकडे मिळाल्याची माहिती सूत्राने दिली. शाहिद खान याने दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादेतील मित्राकडे एक दुचाकी आणून ठेवली होती. या गाडीबाबत संशय येऊ नये, म्हणून शाहिदने त्यावर क्रमांक बदलला होता. दरम्यान शाहिदला एटीएसने अटक केल्याचे वृत्त झळकताच त्याच्या मित्राला या दुचाकीबद्दल संशय आला. त्याने चार दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन या दुचाकीची माहिती त्यांना दिली. त्यानंतर आयुक्तांनी तात्काळ गुन्हे शाखेला ही दुचाकी ताब्यात घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच एटीएसच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्याच्या या मित्राबाबत कळवले. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या या मित्राची सखोल चौकशी केली. त्याचा जबाव नोंदवून घेतला.