शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शांती मार्चने दणाणले शहर

By admin | Updated: December 22, 2015 00:13 IST

औरंगाबाद : महापालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेली धम्मभूमी आणि शहरातील ९५ विहारे

औरंगाबाद : महापालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेली धम्मभूमी आणि शहरातील ९५ विहारे अतिक्रमण समजून ती पाडण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा, या मागणीसाठी आज सोमवारी तमाम आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरले. क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालय या मार्गाने निघालेल्या जवळपास ४० ते ५० हजार नागरिकांच्या शांती मार्चने संपूर्ण शहर दणाणून गेले. जालना रोडसह शहरातील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. शहरातील बुद्धविहारे बचाव, असा नारा देत दलित अत्याचार विरोधी सर्वपक्षीय कृती समिती व भिक्खू संघ यांच्या विद्यमाने सोमवारी शांती मार्चचे आयोजन केले होते. यासंदर्भात कृती समितीच्या सदस्यांनी मागील काही दिवसांपासून दलित वस्त्या, बुद्धविहारांमध्ये बैठका घेऊन या शांती मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आवाहनाला संपूर्ण शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ट्रक, मिनी बस, जीप, टेम्पो, कार अशा मिळेल त्या वाहनातून आंबेडकर अनुयायांचे जथेच्या जथे क्रांतीचौकात येत होते. त्यामुळे क्रांतीचौकापासून सोमवारी सकाळी ११.३० वाजता निघणारा हा शांती मार्च अखेर दुपारी १ वाजता सुरू झाला. भदन्त विशुद्धानंद बोधी महास्थवीर, भदन्त डॉ. एम. सत्यपाल, भदन्त नागसेन व भिक्खू संघाने बुद्धवंदना पठण केल्यानंतर नियोजित शांती मार्च पुढे निघाला. जसजसा हा शांती मार्च पुढे जात होता तसतसे नागरिकांचे जथे सहभागी होत गेले.