फर्दापूर भागात टेम्पोचोरांना घातल्या बेड्या

By Admin | Updated: July 14, 2015 00:28 IST2015-07-14T00:28:06+5:302015-07-14T00:28:06+5:30

फर्दापूर/अजिंठा : विविध ठाण्यात गुन्हा दाखल असलेले टेम्पो चोर फर्दापूर (ता. सोयगाव) भागातून औरंगाबाद ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.

Shackles inserted into temples in Fremdur area | फर्दापूर भागात टेम्पोचोरांना घातल्या बेड्या

फर्दापूर भागात टेम्पोचोरांना घातल्या बेड्या


फर्दापूर/अजिंठा : विविध ठाण्यात गुन्हा दाखल असलेले टेम्पो चोर फर्दापूर (ता. सोयगाव) भागातून औरंगाबाद ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. अटकेतील आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असून त्यांनी अजिंठा भागातून ठिबक सिंचनच्या पाईपचीही चोरी केल्याची कबुली दिली आहे.
अलिखाँ शामदखाँ पठाण, अजीजखाँ मजीदखाँ पठाण (दोघे रा. वैताळवाडी, ता. सोयगाव) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना पुढील तपासासाठी अजिंठा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कांचनकुमार चाटे यांनी सांगितले की, या चोरट्यांनी अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अंभई येथून २८ मे २०१५ रोजी टेम्पो (क्र. एमएच २०, एटी ७१६४) चोरून नेला होता. त्यांच्याविरुद्ध अजिंठा, सिल्लोड शहर, सोयगाव, पहूर (जि. जळगाव), पारध (जि. जालना) येथे टेम्पो चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अजिंठा, सोयगाव येथे ठिबकचे पाईप चोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे. या आरोपींना पुढील तपासासाठी अजिंठा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
दरम्यान, हे दोघे फर्दापूर भागात संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून स्थागुशाचे पो.उप नि. डी.पी. सरोदे, मोहिते, घुगे, देशमुख, चव्हाण व भिल्ल यांनी त्यांना पकडले.

Web Title: Shackles inserted into temples in Fremdur area