शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कृषीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प जाहीर करावा

By admin | Updated: July 6, 2014 00:34 IST

औरंगाबाद : भारत कृषिप्रधान देश आहे. येथील ८० टक्के जनता कृषी क्षेत्राशी जोडली गेली आहे.

औरंगाबाद : भारत कृषिप्रधान देश आहे. येथील ८० टक्के जनता कृषी क्षेत्राशी जोडली गेली आहे. या क्षेत्राची व्याप्ती लक्षात घेता केंद्र सरकारने कृषीचा स्वतंत्र अर्थसंकल्प जाहीर करावा, अशी मागणी शहरातील बी-बियाणे वितरक व शेतकऱ्यांनी केली आहे. यंदा संपूर्ण जून महिना कोरडा ठणठणीत गेला. त्याचा फटका अर्थातच शेती क्षेत्राला आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे. संपूर्ण देशात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या धर्तीवर येत्या ११ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. सर्वांप्रमाणे कृषी क्षेत्राचेही लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. शेतीच्या विकासासाठी नवीन सरकार कोणत्या योजना जाहीर करते, यासाठी सर्वांची उत्सुकता वाढली आहे. कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प जाहीर करावा, अशी मागणी कृषी क्षेत्रातील बी-बियाणे वितरक, शेतकऱ्यांनी केली आहे. आता केंद्राचा अर्थसंकल्प तयार झाला आहे. मात्र, पुढील वर्षापासून रेल्वेप्रमाणे कृषीचाही स्वतंत्र अर्थसंकल्प जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा या अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी बी-बियाणे विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राकेश सोनी यांनी केली. मँगो ग्रोअर्स असोसिएशनचे सचिव त्र्यंबक पाथ्रीकर यांनी सांगितले की, गारपीट आणि आता दुष्काळी परिस्थिती यामुळे शेती करणे बेभरवशाचे झाले आहे. दरवर्षी कोणती तरी नैसर्गिक आपत्ती येत असते आणि त्यात शेतीचे मोठे नुकसान होत असते. यासाठी केंद्राने शेतीसाठी नुकसानभरपाईच्या स्वतंत्र निधीची तरतूद करावी. जेणेकरून आपत्तीच्या वेळी तो निधी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना देता येईल. खताची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी. ठिबक सिंचनाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे. त्याकरिता विद्राव्य खताला सरकारने सबसिडी द्यावी. आधारभूत किमतीमध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात यावी. बियाणे वितरक जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता रासायनिक खते व कीटकनाशकांच्या किमती कमी करण्यात याव्यात. केंद्र सरकारने पीक विमा सक्तीचा करावा. जेणेकरून नैसर्गिक आपत्ती आल्यास त्या विम्याचा शेतकऱ्यास आधार होईल. अमित नावंदर यांनी सांगितले की, कृषीसाठी मोफत वीज न देता २४ तास अखंडित वीजपुरवठा करावा, जेणेकरून पिकाला योग्यवेळी पाणी मिळेल व उत्पादन दुपटीने वाढेल. जितेंद्र पाटणी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्प मांडण्यात यावा. प्रत्येक शेतीमालाचा हमीभाव ठरविण्यात यावा.