शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस ताट संख्येसाठी वरिष्ठांचे दबावतंत्र !

By admin | Updated: April 19, 2016 01:20 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड वैद्यकीय देयकावरून संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून आता रुग्णांसाठी देत असलेल्या जेवणाचे ताट (डाएट)

व्यंकटेश वैष्णव , बीडवैद्यकीय देयकावरून संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून आता रुग्णांसाठी देत असलेल्या जेवणाचे ताट (डाएट) वाढवून लावण्याबाबत कक्षप्रमुखांवर दबावतंत्र वापरले जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.येथील जिल्हा रुग्णालय प्रशासन या ना त्या कारणाने सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. गत आठवड्यापूर्वी वैद्यकीय देयकासंदर्भाने लाच घेताना एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. आता पुन्हा नवा मुद्दा समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी मोफत जेवण दिले जाते. हे जेवण सर्व वार्डातील गोरगरीब रुग्णांसाठी शासनाने मोफत दिलेले आहे. या जेवणाचे टेंडर वर्षभरापूर्वीच झालेले आहे.जिल्हा रुग्णालयातील एका वार्डात ६० ते ७० रुग्ण दाखल असतात. यातील २० ते २५ रुग्ण जेवणाचे ताट (डाएट) घेतात. उर्वरित रुग्ण शहरातील किंवा शहराजवळचे असल्याने रुग्णांचे नातेवाईक घरून जेवणाचा डबा घेऊन येतात. मात्र, जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या ज्या रुग्णांनी डाएट घेतले नाही त्यांचीही नावेही लावत बोगस ताट संख्या वाढविली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे.याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, जे रुग्ण जेवणाचे ताट घेणार नाही त्यांनाही देण्याबाबत आग्रह करा, अशा वरिष्ठांच्या तोंडी सूचना आहेत. या प्रकारावरून ठेकेदार व रुग्णालय प्रशासन यांच्यात मिलीभगत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.१०० रूपयाला एक ताट...जिल्हा रुग्णालयात एकूण ३२० वर खाटा आहेत. मात्र, ४०० ते ४५० वर दररोज रुग्ण उपचारासाठी दाखल असतात. रुग्णांना अत्यल्प पैशात जेवण मिळावे हा उद्देश आरोग शासनाचा आहे. १०० रूपयांमध्ये दोन वेळा चहा, एक वेळा नाश्ता व दोन वेळा जेवण दिले जाते. या सर्व डाएटसाठी रुग्णांकडून केवळ १० रूपये घेतले जातात. मात्र, ठेकेदाराला शासनाकडून १०० रूपये दिले जात असल्याचेही सांगण्यात आले. रुग्णांच्या जेवणाच्या ताटाआड अर्थकारण दडले आहे.