औंढा नागनाथ येथे खुलेआम गुटखा विक्री

By Admin | Updated: August 4, 2014 00:52 IST2014-08-03T23:46:48+5:302014-08-04T00:52:13+5:30

औंढा नागनाथ : गुटखा विक्रीला बंदी असतानासुद्धा औंढ्यात ठिकठिकाणी खुलेआम गुटख्याची विक्री होताना दिसून येत आहे. या भागात सुमारे दोनशे पानटपऱ्यांमधून ही विक्री राजरोसपणे होत आहे.

Selling openly Gutkha at Aunda Nagnath | औंढा नागनाथ येथे खुलेआम गुटखा विक्री

औंढा नागनाथ येथे खुलेआम गुटखा विक्री

औंढा नागनाथ : गुटखा विक्रीला बंदी असतानासुद्धा औंढ्यात ठिकठिकाणी खुलेआम गुटख्याची विक्री होताना दिसून येत आहे. या भागात सुमारे दोनशे पानटपऱ्यांमधून ही विक्री राजरोसपणे होत आहे.
राज्य शासनाने मागील वर्षापासून गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे. औंढा नागनाथ येथे हिंगोली- परभणी राज्य रस्त्यालगत व मंदिर परिसरात अशा दोनशेच्या वर पानटपऱ्या आहेत. या माध्यमातून गुटखामाफिया विविध कंपनीच्या गुटखा पुड्यांचा पुरवठा पद्धतशीरपणे करतात. त्याच प्रमाणे काही ठराविक किराणा दुकानांतून सुुुुद्धा या गुटख्यांच्या पुड्या पानपट्टी धारकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. एक रुपयांची पुडी १० रुपयाला विक्री होत आहे. पानटपरीपेक्षा पुरवठादार जादा मुनाफा घेऊन पैसे कमावताना दिसून येत आहे. याकडे अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे.
औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यांच्याकडून गुटखा विक्रेते दामदुप्पट किंमत घेऊन गुटख्यांची विक्री करीत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
औंढा हे तीर्थक्षेत्र असून अधिकाऱ्यांचे गुटखा विक्रीकडे दुर्लक्ष होत आहे.
मंदिर परिसरातच गुटखा विक्री सुरू आहे.

Web Title: Selling openly Gutkha at Aunda Nagnath