कंपनीसह विक्रेत्यास दंड

By Admin | Updated: May 23, 2014 00:21 IST2014-05-22T23:57:05+5:302014-05-23T00:21:37+5:30

उस्मानाबाद: तांत्रिक बिघाड असलेला टेम्पो ग्राहकास पुरविल्याप्रकरणी टाटा कंपनीसह लातूर येथील बाफणा मोटार्सला जिल्हा ग्राहक मंचने दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे़

Sellers penalty with company | कंपनीसह विक्रेत्यास दंड

कंपनीसह विक्रेत्यास दंड

 उस्मानाबाद: तांत्रिक बिघाड असलेला टेम्पो ग्राहकास पुरविल्याप्रकरणी टाटा कंपनीसह लातूर येथील बाफणा मोटार्सला जिल्हा ग्राहक मंचने दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे़ उस्मानाबाद येथील जयराम निवृत्ती लोमटे यांनी लातूर येथील बाफना मोटर्स शोरूममधून टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो खरेदी केला होता़ मात्र, काही काळातच टेम्पोच्या ब्रेक सिस्टीमध्ये दोष असल्याचे लोमटे यांच्या लक्षात आले़ त्यांनी टाटा कंपनी व बाफना मोटर्सकडे याबाबत तक्रार करत दुरूस्ती करून देण्याची मागणी केली़ कंपनीने मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले़ वारंवार पाठपुरावा करूनही काहीच उपयोग होत नसल्याने लोमटे यांनी अ‍ॅड़एम़बी़माढेकर यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये तक्रार दाखल केली होती़ यावेळी समोर आलेले पुरावे, साक्ष व अ‍ॅड़माढेकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून मंचचे अध्यक्ष एम़ व्ही़ कुलकर्णी, सदस्य मुकुंद सस्ते यांनी तक्रार मान्य करत बाफना मोटार्स व टाटा कंपनीला ५० हजार रूपयांचा दंड तसेच पाच हजार रूपये खर्च देण्याचे आदेश दिले़ तक्रारदाराच्या बाजूने काम पाहणार्‍या अ‍ॅड़ माढेकर यांना अ‍ॅड़अमर इंगळे यांचे सहाय्य लाभले़ (प्रतिनिधी)

Web Title: Sellers penalty with company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.