शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेआधीच संपणार वसतिगृहांचा ‘हंगाम’ !

By admin | Updated: March 27, 2015 00:25 IST

बीड : ऊसतोडी व विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी असतानाच हंगामी वसतिगृहांचा ‘हंगाम’ ३१ मार्च रोजी संपणार आहे

बीड : ऊसतोडी व विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी असतानाच हंगामी वसतिगृहांचा ‘हंगाम’ ३१ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या २४ हजारांहून अधिक पाल्यांना याचा फटका बसणार आहे. उल्लेखनीय हे की, वसतिगृहे आधीच एक महिना उशिराने सुरू झालेली आहेत.जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची २४ हजार ७४० इतकी मुले ४८१ हंगामी वसतिगृहांमध्ये शिक्षण घेत आहेत. या वसतिगृहांत शिक्षणासोबतच निवासाची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. १ आॅक्टोबर ते ३१ मार्च या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, दिवाळीनंतर ऊसतोड कामगारांना विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे आॅक्टोबर महिना उलटल्यानंतर एकही वसतिगृह सुरू होऊ शकले नव्हते. महिनाभर उशिराने सुरू झालेली वसतिगृहे आता ३१ मार्च रोजी बंद करण्याचे आदेश राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत.वसतिगृहांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या परीक्षा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. एप्रिल महिन्यात परीक्षा होणार आहेत. मात्र परीक्षांपूर्वीच वसतिगृहांना टाळे लागणार असल्यामुळे ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचा आधार हरवणार आहे. वसतिगृहे महिनाभर उशिराने सुरू झाली. त्यामुळे आणखी महिनाभर मुदतवाढ मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप शिक्षण विभागाने कुठल्याही हालचाली केलेल्या नाहीत. याउलट गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र धाडून वसतिगृहे ३१ मार्च रोजी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.विद्यार्थ्यामागे आठ हजारावर खर्चवसतिगृहाची जबाबदारी मुख्याध्यापक, शालेय शिक्षण समितीवर आहे. प्रति विद्यार्थी ८२०० रूपये इतका खर्च सहा महिन्यात होतो. हंगामी वसतिगृहात कमीत कमी २० विद्यार्थी असणे आवश्यक आहेत. दरम्यान, जिल्ह्यासाठी १९ कोटी ८२ लाख ९२ हजार रूपये इतका निधी मंजूर आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ७ कोटी ४८ लाख ७८ हजार ६५६ रूपये इतका निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वसतिगृह चालकांची उसनवारी सुरू आहे. निधीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सर्व शिक्षा अभियानचे उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड म्हणाले. (प्रतिनिधी)फेब्रुवारीमध्ये १४८ केंद्रप्रमुख, ९ विस्तार अधिकारी व ५ अधिकाऱ्यांमार्फत वसतिगृहांची तपासणी झाली. त्यात २४ हजार ७४० विद्यार्थी आढळून आले. आढळलेल्या विद्यार्थी संख्येनुसार अनुदान वाटप करण्याच्या सूचना सीईओ नामदवे ननावरे यांनी दिल्या.परीक्षा बाकी असल्या तरी शासनाने ३१ मार्च रोजी वसतिगृहे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.- सुखदेव सानप, शिक्षणाधिकारी (प्रा.)परीक्षा होणे बाकी असल्यामुळे हंगामी वसतिगृहांना मुदतवाढ द्यावी, अशी शिफारस एकाही गटशिक्षणाधिकाऱ्याने केली नाही. शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांनीही तसदी घेतलेली नाही.