शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

शाळांतील शौचालयाचा वापर ‘कागदावरच’

By admin | Updated: November 21, 2014 00:47 IST

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांच्या मनावर शालेय जीवनापासूनच स्वच्छतेचे महत्व बिंबविले जावे, यासाठी शाळा तेथे प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे.

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांच्या मनावर शालेय जीवनापासूनच स्वच्छतेचे महत्व बिंबविले जावे, यासाठी शाळा तेथे प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून दरवर्षी शौचालयाच्या वापराबाबतचा अहवाल मागविला जातो. त्यावेळी सर्वच शाळांकडून ‘नियमित वापर सुरु आहे’ हा ठरलेला शेरा मारुन अहवाल पाठविला जातो. हा कागदोपत्री खेळ वाड्या-वस्त्यांपासून थेट मुंबईपर्यंत सुरु असतो. दि. १४ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या कालावधित उस्मानाबादसह जिल्ह्यातील शाळात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात आले. या उपक्रमाचा बुधवारी शौचालय दिनाने समारोप झाला. परंतु, खरेच या शाळांमध्ये शौचालये आहेत का? त्यांचा नियमित वापर केला जातो का? असा प्रश्न निर्माण होतो. याच अनुषंगाने ‘लोकमत’ चमुने गुरुवारी जिल्हाभरातील काही शाळांना अचानक भेट दिली. यावेळी अत्यंत विदारक चित्र दिसून आले. अनेक शाळातील शौचालये कुलूपबंद असल्याचे पहावयास मिळाले. तर काही ठिकाणी शौचालयामध्ये दगडगोटे पडल्याचे दिसले. मध्यंतरी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न चव्हाट्यावर आला होता. त्यावेळी तातडीने उपाययोजना केल्या होत्या. आता पुन्हा हा प्रश्न डोके वर काढण्याच्या स्थितीत आहे. अनेक शाळात अस्वच्छता पसरल्याचेही यावेळी प्रकर्षाने दिसून आले.दत्ता गायके ल्ल येरमाळायेथे जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत. एका शाळेचे प्रसाधनगृह कुलूपबंद अवस्थेत आहे. तर मुलींसाठीचे प्रसाधनगृह मोडकळीस आले आहे. शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे पहावयास मिळाले. असुविधांच्या गर्तेत सापडलेल्या या शाळांमध्ये बसूनच विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे.केंद्रीय प्राथमिक शाळा असणाऱ्या येरमाळा येथील शाळेत मुलांची वेगळी तर मुलींची वेगळी अशी स्वतंत्र शाळा आहे. मुलांच्या शाळेत १५४ विद्यार्थी व मुलींच्या शाळेत १२१ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. यासाठी दोन्ही शाळेच्या मिळून १२ शिक्षक व एक शिपाई असा एकूण शिक्षक स्टाफ आहे. मात्र याठिकाणी पूर्णपणे सुविधांचा अभाव असून, पिण्याच्या पाण्याची कसलीही व्यवस्था नाही. पाण्याच्या दोन टाक्या बांधल्या आहेत. यात पाणी नसल्याने विद्यार्थी घरातूनच पाण्याच्या बाटल्या घेवून आपली तहान भागवत असताना दिसत आहे. जून महिन्यात याठिकाणी बोअरही घेतलेले आहे. त्यास पाणीही लागले आहे. मात्र यात मोटार टाकली नसल्याने बोअर पाडून अद्याप याचा उपयोग होत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी स्टेट बँकेने वॉटर फिल्टर तसेच पाण्याची टाकी देवूनही ह्या सगळ्या वस्तू कचऱ्यात पडल्या आहेत. येथील शौचालयाचे पूर्णपणे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र हे पाण्याअभावी बांधल्या दिवसापासूनच कुलूपबंदच आहेत. तसेच मुलांसाठी बांधलेले शौचालय हे पूर्णपणे मोडकळीस आल्याने शौचालयासाठी मुला-मुलींची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. तसेच शाळा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. १४ नोव्हेंबर रोजी शासनाने शाळा स्वच्छ करण्याची सक्ती केली. यावर शाळेत वरिष्ठ मंडळींकडून स्वच्छतेचे महत्वही सांगण्यात आले. मात्र शिक्षक वर्गाकडून हा उपक्रम फारसा गांभिर्याने घेतला जात नसल्याचे दिसते.अमित सोमवंशी ल्ल उस्मानाबादशाळेत मुलं गेली म्हणजे आई-वडील बिनधास्त असतात. अनेक जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी कुठे आहे तर कुठे नाही. तसेच बांधण्यात आलेल्या शौचालयामध्ये घाणीचे साम्राज्य दिसून आले तर काही पाण्याअभावी बंद ठेवण्यात आल्याचे दिसले.उत्तमी येथील पहिली ते आठवी शाळेत ९७ विद्यार्थी आहेत. तेथील स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य दिसून आले. असे असले तरी येथील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय बऱ्यापैकी आहे. नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पळसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शौचालये बांधण्यात आले असले तरी पाण्याची सोय नसल्याने त्याचा नियमित वापर होत नसल्याचे तेथील विद्यार्थ्यांनी सांगितले. शाळेच्या पाठीमागील परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय नसल्याचे दिसून आले. शाळेसमोरीलच एका शेतकऱ्याच्या शेतातून पाणी आणून विद्यार्थ्यांना पुरविले जाते. शौचालयाचा वापर करायचा झाल्यास दुसऱ्या ठिकाणाहून पाणी आणावे लागत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.संतोष मगर ल्ल तामलवाडीवडगाव (काटी) शाळेतील प्रसाधनगृहाची अवस्था अत्यंत वाईट आहे. या प्रसाधनगृहाला दरवाजांचा पत्ता नाही. भांड्यामध्ये वाळू आणि विटांचे तुकडे पडलेले आहेत. शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. विद्यार्थ्यांना घरुनच पाणी आणावे लागते. सदरील शाळेमध्ये जवळपास अडीचशे विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवित आहेत. एकीकडे स्वच्छ भारत अभियानाला गती देण्याचे आवाहन वरिष्ठ कार्यालयाकडून केले जात असतानाच कचऱ्याचे ढिग तुडवत विद्यार्थ्यांसोबतच गुरुजींनाही शाळेत प्रवेश करावा लागत आहे. याबाबत विद्यार्थ्यांतूनही नाराजी व्यक्त होत आहे.गुरुजींना बाटलीबंद पाणीशाळेच्या आवारात पाण्याची टाकी आहे. मात्र ती कोरडीठाक पडली आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गुरुजी घरुनच पाण्याच्या बाटल्या भरुन घेवून येत आहेत.