शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय वाहनांची सुरक्षितता ऐरणीवर

By admin | Updated: July 16, 2014 01:28 IST

औरंगाबाद : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनला आग लागण्याची घटना सोमवारी सायंकाळी जळगाव रोडवर घडली.

औरंगाबाद : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनला आग लागण्याची घटना सोमवारी सायंकाळी जळगाव रोडवर घडली. आगीत ही व्हॅन जळून खाक झाली. सुदैवाने व्हॅनमध्ये मुले नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे मात्र, पुन्हा एकदा शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पर्यायाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न रडारवर आला आहे; परंतु ही सुरक्षितता कोण आणि कधी पाहणार? असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये निर्माण होत आहे.वाहनांच्या इंधन पद्धतीत अनधिकृतपणे बदल करणे, घरगुती गॅसवर वाहन चालविणे, शालेय विद्यार्थ्यांची अवैध आणि धोकादायकरीत्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलीस, आरटीओ कार्यालयाकडून कारवाई केली जाते; परंतु गेल्या काही दिवसांपासून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर आणि अनधिकृत वाहनांवर कारवाई के ली जाते; परंतु कारवाई करताना अशा वाहनांमध्ये शाळेचे विद्यार्थी असतात. त्यामुळे कारवाईदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होते. त्यामुळे कारवाई करण्यात या समस्येची अडचण येते का? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अवैध आणि धोकादायकरीत्या विद्यार्थ्यांची होणारी वाहतूक रोखण्याचे आव्हान संबंधित प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. जूनमध्ये जिल्ह्यातीत मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत ६० टक्के शाळांमध्ये ही समिती स्थापन झाली नसल्याचे समोर आले होते. ही माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली.शाळांचेही वारंवार दुर्लक्षविद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. शाळेचा विद्यार्थी कोणत्या वाहनातून येतो, ते वाहन योग्य आहे की नाही. याबाबत परिवहन समितीद्वारे माहिती घेणे आवश्यक आहे. मात्र, याचे पालन होत नसल्याचे दिसते. अनेक शाळांकडून परिवहन समिती स्थापन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.दर तीन महिन्यांनी बैठकपरिवहन समिती स्थापन करणे प्रत्येक शाळेला बंधनकारक आहे. जूनमध्ये याबाबत मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान ६० टक्के शाळांमध्ये ही समिती स्थापन झाली नसल्याचे समोर आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत शाळांमध्ये समित्या स्थापन झालेल्या असल्याने हे प्रमाण आता कमी झाले असेल. शालेय परिवहन समितीबाबत दर तीन महिन्यांनी बैठक घेण्यात येते. प्रत्येक शाळेने वाहन, चालक योग्य आहे की, नाही याचा आढावा घेतला पाहिजे.-नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषदपालकांनीही दक्ष राहावेकालच्या घटनेतील वाहन हे अनधिकृत आहे. अशा वाहनांवर कारवाई करणार आहोत. मात्र, याबरोबर मुलांना शाळेत सोडणारे वाहन अधिकृत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी पालक आणि शाळांचीही आहे. प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करणे गरजेचे आहे.-गोविंद सैंदाणे,प्रादेशिक परिवहन अधिकारीमनुष्यबळ दिले जाईलशालेय परिवहन समितीत वाहतूक शाखा अथवा पोलीस ठाण्याचे कर्मचारी सदस्य म्हणून असतात; परंतु अद्याप एकाही शाळेने त्यासाठी पत्र पाठविलेले नाही. अनधिकृत गॅसकिट बसविणारी वाहने अथवा अन्य वाहने अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ कार्यालयास मनुष्यबळ दिले जाईल.-अजित बोऱ्हाडे, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक)