शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
5
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
6
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
7
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
8
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
9
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
10
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
11
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
12
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
13
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
14
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
15
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
16
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
17
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
18
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
19
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
20
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी विद्यार्थी घरातून बेपत्ता

By admin | Updated: June 18, 2014 01:30 IST

ेहिंगोली : शहरातशिक्षणासाठी राहत असलेला १५ वर्षीय शाळकरी मुलगा काकाच्या घरातून रात्रीच्यावेळी अचानक गायब झाल्याची घटना १७ जून रोजी सकाळी उघडकीस आली.

ेहिंगोली : शहरातशिक्षणासाठी राहत असलेला १५ वर्षीय शाळकरी मुलगा काकाच्या घरातून रात्रीच्यावेळी अचानक गायब झाल्याची घटना १७ जून रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी मोबाईलचे लोकेशनचे शोधले असता तो शिर्डीत असल्याची माहिती मिळाल्याने एक पथक तिकडे पाठविण्यात आले आहे.
शहरातील शिवाजी नगरमध्ये डॉ. संजय घुगे यांचा श्री विश्वब्रम्ह आयुर्वेदीक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र आहे. दवाखान्यामागेच त्यांचे घर आहे. परभणी जिल्ह्यातील टाकळखोपा (ता. जिंतूर) येथील त्यांचा पुतण्या ऋषिकेश उद्धवराव घुगे (वय १५) हा हिंगोलीतील भारतीय विद्या मंदीर शाळेमध्ये यंदा दहावीच्या वर्गात शिकत आहे. शिक्षणासाठी तो काकाकडेच राहतो. सोमवारी शाळा सुरू झाल्या. सोमवारी रात्री तो नेहमीप्रमाणे काकांच्या दवाखान्यात झोपण्यासाठी गेला होता. मंगळवारी सकाळी ६ वाजता डॉ. संजय घुगे पत्नीला बसस्थानकावर सोडण्यासाठी गेले असता साफसफाई करणाऱ्या महिलेने आवाज देऊन दवाखान्याचा दरवाजा ऋषिकेशने आतून उघडला नाही. डॉक्टर परत आल्यावर त्यांनी दरवाजा जोराने लोटला असता तो आतून लावलेला नसल्याचे लक्षात आले. तसेच त्यांच्या कॅबीनमधील औषधी-गोळ्यांच्या बाटल्या, डब्बे अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. विशेष म्हणजे दवाखान्यात ऋषिकेशही दिसला नाही. चोरीचा संशय आल्याने डॉ. घुगे यांनी याबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर श्वानपथकासही पाचारण करण्यात आले. श्वानाने कॉलनीतील दत्त मंदिराजवळील एका घरापर्यंत माग काढला. पोलिसांनी सदरील बेपत्ता मुलाचा शोध सुरू केला. मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास देशमुख नावाच्या मित्रास मोबाईलवर कॉल करून ‘मी नागपूरला आहे. कुणाला सांगू नकोस’असे ऋषिकेशने सांगितले. हा कॉल त्याने शिर्डीतून एका क्वॉईन बॉक्सवरून केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मोबाईल लोकेशन शोधून सदरील मुलास आणण्यासाठी जमादार मगन पवार, पोना शेख वसियोद्दीन यांचे पथक डॉ. संजय घुगे यांना सोबत घेऊन मंगळवारी सायंकाळी शिर्डीला रवाना झाले. (प्रतिनिधी)