शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरीत शालेय विद्यार्थ्याचे अपहरणनाट्य

By admin | Updated: July 3, 2014 00:22 IST

नांदेड : विष्णूपुरी भागात बुधवारी सकाळी एका शाळकरी मुलाचे कारमधून आलेल्या तिघांनी अपहरण केल्याचे एका सहा वर्षीय विद्यार्र्थिनीने सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली़

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विष्णूपुरी भागात बुधवारी सकाळी एका शाळकरी मुलाचे कारमधून आलेल्या तिघांनी अपहरण केल्याचे एका सहा वर्षीय विद्यार्र्थिनीने सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली़ या परिसरात पोलिसांनी बराच काळ नाकाबंदी करुन तपासणीही केली़ परंतु अद्याप हरविल्याची किंवा अपहरणाची कोणतीही तक्रार मात्र पोलिसांकडे आली नाही़विष्णूपुरी भागातील मंजूषा मावंदे व श्रृती शिंदे या दोघी जणी बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शंकरराव चव्हाण विद्यालय अर्सजन येथे जात होत्या़ यावेळी त्यांच्यासमोर पिवळा शर्ट व पाठीवर दप्तर असलेला मुलगा होता़ तोच अचानक मुलाच्या जवळ येवून एक कार थांबली़ कारमधील दोघांनी मुलाला जबरदस्ती आत ओढले़ यावेळी मंजूषा हिचाही त्यातील एकाने हात पकडून खेचण्याचा प्रयत्न केला़ परंतु मंजूषाने समोरील व्यक्तीच्या हाताचा चावा घेतला तर श्रृती शिंदे हिने त्याच्या हातावर दप्तर मारले़ त्यानंतर मंजूषा आणि श्रृती यांनी आरडा-ओरड करीत घर गाठून कुटुंबियांना हकीकत सांगितली असल्याचे मंजूषा या चिमुकलीने रडत-रडतच सदर प्रतिनिधीला सांगितले़ त्यानंतर ग्रामस्थांनी ही बाब नांदेड ग्रामीण पोलिसांना कळविली़ पोलिसांनी वाहनांद्वारे सर्व भागात शोधमोहिम राबविली़ नाकाबंदीही करण्यात आली होती़ परंतु अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत़ दरम्यान, ग्रामस्थांनी मुलाचा शोध घेण्यासाठी परिसरातील शाळा त्यांनी धुंडाळून काढल्या़याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे म्हणाले, आम्हाला ग्रामस्थांकडून तशी माहिती मिळाली होती़ त्यानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहिमही राबविली़ परंतु मुलगा हरविल्याची अद्यापही आमच्याकडे तक्रार नाही़ (प्रतिनिधी)