औरंगाबाद : मॉर्निंग वॉक करून घराकडे परतणाऱ्या महिलेला चाटे स्कूलच्या बसची धडक लागली. या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सिडको बसस्टँड- जयभवानीनगर रोडवरील कामगार चौकाजवळ घडली.मंगला दिलीप धामणे (५८, रा. एन-३, सिडको) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, मंगला धामणे या नित्याप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडल्या. वॉक झाल्यानंतर घराकडे परतत असताना कामगार चौकाजवळील चाटे हायस्कूलसमोरच या शाळेची (एमएच-२० सीटी- ३८२९) या क्रमांकाची बस धामणे यांना धडकली. या धडकेने त्या बेशुद्ध पडल्या. घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी ठाण्याचे फौजदार बागूल, बीट मार्शल जमादार शेख, तुकाराम वाघचौरे, बिरारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने ती बस आणि चालकाला ताब्यात घेतले. शिवाय मंगला धामणे यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. या अपघातप्रकरणी दिलीप धामणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालकाविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
स्कूल बसने महिलेला चिरडले
By admin | Updated: September 5, 2014 00:52 IST
औरंगाबाद : मॉर्निंग वॉक करून घराकडे परतणाऱ्या महिलेला चाटे स्कूलच्या बसची धडक लागली. या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू झाला.
स्कूल बसने महिलेला चिरडले
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}