एनसीईआरटीच्या पुस्तकांचा तुटवडा

By Admin | Published: June 10, 2016 11:51 PM2016-06-10T23:51:53+5:302016-06-11T00:16:18+5:30

औरंगाबाद : ‘नीट’ साठी आवश्यक असलेल्या एनसीईआरटीच्या पुस्तकांचा शहरात तुटवडा असून, यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे.

Scarcity of NCERT books | एनसीईआरटीच्या पुस्तकांचा तुटवडा

एनसीईआरटीच्या पुस्तकांचा तुटवडा

googlenewsNext

औरंगाबाद : ‘नीट’ साठी आवश्यक असलेल्या एनसीईआरटीच्या पुस्तकांचा शहरात तुटवडा असून, यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पुढील वर्षी (२०१७) विद्यार्थ्यांना ‘नीट’ (नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) अनिवार्य असल्याने शहरातील बारावीत शिकणाऱ्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी त्याची तयारी सुरूकेली आहे. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यासाठीचे वर्गही सुरू केले आहेत. खाजगी कोचिंगमध्येही सुट्या संपून क्लासेस सुरू झाले आहेत. बारावीचे जे विद्यार्थी सीबीएसई अभ्यासक्रम शिकतात त्या विद्यार्थ्यांनी डिसेंबर २०१५ मध्येच एनसीईआरटीची पुस्तके घेतली आहेत. मात्र, राज्य मंडळाचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या अकरावी आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्याना ‘नीट’ द्यावयाची आहे, अशा विद्यार्थ्यांना आता एनसीईआरटीची पुस्तके घ्यावी लागणार आहेत. राज्य मंडळाचे जे विद्यार्थी अकरावी उत्तीर्ण होऊन बारावीत गेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना आता एनसीईआरटीची अकरावी आणि बारावीची पुस्तके घ्यावी लागणार आहेत.
औरंगपुऱ्यातील विक्रेत्याने सांगितले की, एनसीईआरटीची अकरावी, बारावीची सर्वच पुस्तके १० जूननंतर शहरात उपलब्ध होतील.
शहरातील औरंगपुरा आणि सिडको परिसरातील काही मोठ्या पुस्तक विक्रेत्यांकडे चौकशी केली असता केवळ भौतिकशास्त्रा (फिजिक्स) चे बारावीचे पुस्तक उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. काही विक्रेत्यांकडे एनसीईआरटीची अकरावी आणि बारावीची मिळून एक किंवा दोन पुस्तके उपलब्ध आहेत. ‘नीट’मुळे आधीच त्रस्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके लवकर उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
दहावीसाठी अर्ज करण्याची मुदत
२० जूनपर्यंत
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फ त माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षा सप्टेंबर-आॅक्टोबरऐवजी यंदाही जुलै-आॅगस्टमध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे आवेदनपत्र आॅनलाईन भरणे बंधनकारक आहे. आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत ही २० जून असून, विलंब शुल्कासह आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत २१ ते २४ जूनपर्यंत आहे. माध्यमिक शाळांनी बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरण्याची मुदत हीदेखील २१ ते २४ जूनदरम्यान असून, विलंब शुल्कासह चलन भरण्याची मुदत २७ ते २९ जूनपर्यंत आहे.
माध्यमिक शाळांनी ३० जूनपर्यंत विभागीय मंडळाकडे चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्याच्या सूचना मंडळाने दिल्या असून, पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्र आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेचे आवेदनपत्र शाळेमार्फ तच भरण्याचे आवाहन विभागीय मंडळाने केले आहे.

Web Title: Scarcity of NCERT books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.