पर्यावरण वाचवण्याचा संदेश; औरंगाबादेतील जलतरणपटूने सलग चोवीसतास पोहून केला विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 14:10 IST2022-06-05T14:06:13+5:302022-06-05T14:10:02+5:30
जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून जलतरणपटू राजेश भोसले यांनी सलग चोवीसतास पोहण्याची किमया केली आहे.

पर्यावरण वाचवण्याचा संदेश; औरंगाबादेतील जलतरणपटूने सलग चोवीसतास पोहून केला विक्रम
औरंगाबाद - जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून जलतरणपटू राजेश भोसले यांनी सलग चोवीसतास पोहण्याची किमया केली आहे. निसर्गामुळे आपल्याला स्वास घेता येतो, पोहताना श्वास किती महत्वाचा आहे, हे कळत असल्याने सलग पोहण्याचा उपक्रम केल्याची माहिती जलतरणपटू राजेश यांनी यांनी दिली.
ऑरंगाबाद: जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून जलतरणपटू राजेश भोसले यांनी सलग चोवीसतास पोहण्याची किमया केली. pic.twitter.com/Vroh3mBQvW
— Lokmat (@lokmat) June 5, 2022
सलग चोवीसतास पोहून केला विक्रम
एमजीएम येथील जलतरण तलाव येथे जलतरणपटू राजेश यांनी यांनी सलग चोवीसतास पोहण्याची किमया केली आहे. सलग पोहत असताना प्रत्येक तासाला पाच मिनिटे वैद्यकीय तपासणीसाठी विश्रांती घेण्यात आली. मागील वर्षी सलग 20 तास पोहण्याची किमया राजेश भोसले यांनी केली होती. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता राजेश जलतरण तलावात उतरले होते.
पर्यावरण संवर्धानासाठी केला उपक्रम
भावी पिढी सशक्त रहावी, पर्यावरणाचे महत्व त्यांना कळावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. पोहताना श्वास घेण्याचं महत्व कळलं. तो श्वास पर्यावरणामुळे मिळतो. जुन्या पिढीने वृक्ष लावले म्हणून आज पाल्याला जीवन जगता येत आहे. त्यामुळे आपलं पर्यावरण आपली जबाबदारी असा उपक्रम राबवल्याची माहिती जलतरणपटू राजेश यांनी यांनी दिली.