शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जि.प. शाळेत सीसीटीव्ही

By admin | Updated: June 28, 2014 01:20 IST

साहेबराव हिवराळे, औरंगाबाद देशातील पहिलीच ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त साताऱ्यातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.

साहेबराव हिवराळे, औरंगाबाददेशातील पहिलीच ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त साताऱ्यातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.प्रशस्त इमारतीत संगणक कक्ष, अद्ययावत ग्रंथालय, प्रयोग शाळा, उद्यान अशा शाळेत शिकविण्याचे काम अधिक गुणवत्तेचे व पारदर्शक व्हावे, या उद्देशाने ही उपाययोजना करण्यात आली आहे. खाजगी शाळेलाही मागे टाकेल, अशा या शाळेत यंदापासून आठवीचा वर्गही सुरू झाल्यामुळे स्थानिक मुला- मुलींना आता दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच उपलब्ध झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेचे व्यवस्थापन व शिक्षक आणि शालेय समितीच्या पुढाकाराने नवीन उपक्रम राबविण्यावर कायम भर दिला जातो. लहान वयातच मुलांना संगणकाचे धडे दिले जात असून अ आ ई इ आणि ए.बी.सी.डी.सह कवितांचे सादरीकरण तालासुरात करण्यातही मुले मागे राहिलेली नाहीत. शाळेच्या भिंतीवर विविध सुविचार आणि शिक्षणाशी संबंधित घोषवाक्ये लिहिलेली आहेत. प्रत्येक वर्गासमोर उपस्थितीची आकडेवारी लिहिलेली असते. त्यामुळे अधिकारी केव्हाही शाळेला भेट देण्यास आले तरी त्यांना वर्गातील उपस्थिती कळते. आयएसओ मानांकन, तसेच साने गुरुजी स्वच्छ सुंदर शाळेचा तालुका, जिल्हा आणि विभाग असे सलग तीन पुरस्कारही या शाळेने मिळविले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी समितीच्या बैठकीत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय झाला. सर्व्हे करून १५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी शाळेत नजर ठेवली जाणार आहे. शाळेत यंदाचा प्रवेशही दरवर्षीप्रमाणे वाढला आहे. खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेतील मुलांचा दर्जा उत्तम आहे, असे शालेय समितीचे रवींद्र चांदगुडे म्हणाले. शैक्षणिक प्रगतीसाठीशालेय समितीचे पदाधिकारी रवींद्र चांदगुडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, समिती दरवर्षी काही ना काही नवे प्रयोग करते. मुलांच्या हितासाठी हा निर्णय समितीने सर्वांनुमते घेतला. अध्यक्ष सजाउल्ला शेख, मुक्तार पटेल, फेरोज पटेल, सुभाष पारखे, भानुदास इंदापुरे, मोहन साबळे, रऊफ शेख, किशोर पारखे, महिला सदस्या पूजा औटी, संगीता पारखे, अर्चना दांडगे, काशीबाई काळे, लता पारखे, सीमा चांदगुडे, शांता तळेकर, मनोहर देवकर व पदाधिकाऱ्यांचाही या उपक्रमात सहभाग आहे. शाळेची वैशिष्ट्येशालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या जिल्ह्यातील पहिली ‘आयएसओ’ मानांकन जि.प. शाळा आता सीसीटीव्हीने जोडल्याचा सातारावासीयांना आनंदसंगणक, प्रयोग, वाचनालय कक्ष, प्रशस्त खेळणीसलग तीनवेळा स्वच्छ व सुंदर शाळेचा पुरस्कारशाळेच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉक आणि नेट शेडमुलांनी वनस्पती फुलविलेले उद्यान, गांडूळ खत प्रकल्पसातारा जिल्हा परिषद शाळेतील सीसीटीव्ही बसविणारे तानाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कॅमेरा वर्ग खोली कव्हर करील. त्याचे नियंत्रण कार्यालयात राहील. १५ कॅमेऱ्यांपैकी १ कार्यालय, २ कॅम्पस, संगणक कक्षासह प्रत्येक वर्ग खोलीत एकेक बसविला जाईल. यामुळे पालकांसह, शालेय समितीला किंवा अधिकाऱ्यांनाही वर्ग खोलीची माहिती क्षणात मिळेल.