शहरं
Join us  
Trending Stories
1
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
2
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
3
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
4
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
5
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
6
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
7
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
8
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
9
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
10
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
11
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
12
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
13
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
14
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
15
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
16
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
17
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
18
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
19
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
20
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-देवळाई न.प.व्हावी ‘मॉडेल’

By admin | Updated: September 5, 2014 00:51 IST

साहेबराव हिवराळे, औरंगाबाद औरंगाबाद शहराचे उपनगर किंवा औरंगाबादच्या हद्दीला जोडून असणाऱ्या सातारा आणि देवळाई या ग्रामपंचायतींच्या गावाच्या विकासाचा डोलारा औरंगाबादच्या जिवावरच तयार झाला.

साहेबराव हिवराळे, औरंगाबादजिल्ह्यातील ‘ब’ वर्गाची नवी नगर परिषद अस्तित्वात आली आहे. औरंगाबाद शहराचे उपनगर किंवा औरंगाबादच्या हद्दीला जोडून असणाऱ्या सातारा आणि देवळाई या ग्रामपंचायतींच्या गावाच्या विकासाचा डोलारा औरंगाबादच्या जिवावरच तयार झाला. शहरात घरे महाग झाली, त्याबरोबरच २० वर्षांपासून सातारा भागाकडे नागरिकांचा ओढा वाढला. तेथे बैठ्या घरांबरोबरच मोठमोठ्या इमारती आणि अपार्टमेंट, मोठे गृहप्रकल्प उभे राहिले. त्यातून अस्ताव्यस्तपणा वाढला. ग्रामपंचायतीला कारवाईचे अधिकार मर्यादित असल्याने वाट्टेल त्या पद्धतीने बांधकामे झाली. राजकारणाच्या गाड्यातही ग्रामपंचायत अडकली. साताऱ्यानंतर देवळाई ग्रामपंचायतीच्या हद्दीत वस्ती वाढली. त्या भागातही नागरी वसाहती वाढल्या. नळाचे पाणी नसतानाही वस्त्या वाढल्या. या वाढीचा वेग इतका जोरकस होता की, दोन्ही ग्रामपंचायतींना काय नियोजन करावे हे सुचलेच नाही. त्यातून निर्माण झाला तो अनियंत्रित विकास. अरुंद रस्ते, नाल्यांवर झालेले बांधकाम, सार्वजनिक जागांचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था, साफसफाईचा अभाव या चक्रात ही दोन्ही गावे अडकल्याचे दिसते. त्यातून नगर परिषदेची मागणी झाली आणि ती बऱ्याच प्रयत्नांनंतर पूर्णही झाली. नगर परिषद आली तरी समस्या सोडविण्याचे आव्हान सातारा आणि देवळाईवासीयांसमोर उभे ठाकले आहे. नागरिकांच्या दृष्टीने आता पाणी मिळणार का, रस्ते होणार का, नाले मोकळे होणार का हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्याबाबत लोकमततर्फे आयोजित परिचर्चेत दोन्ही गावांतील कार्यकर्त्यांनी आणि प्रशासक म्हणून कारभार हाती आलेल्या तहसीलदार विजय राऊत यांनी आपापली भूमिका स्पष्ट केली. सातारा आणि देवळाई नगर परिषद ‘मॉडेल’ तयार करण्याचा निर्धार या परिचर्चेत व्यक्त करण्यात आला. पहिले प्राधान्य राहील ते पाणी मिळविण्यासाठी. त्याबाबत तातडीने प्रशासकांसह जागरूक नागरिकांनी लक्ष घालण्याचे ठरविण्यात आले. याबरोबर प्रशासक विजय राऊत यांनीही पाणी मिळविण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील यासंबंधी विचार करून सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन यावेळी दिले. या चर्चेत दोन्ही गावांतील मान्यवरांनी सहभाग दर्शवून सातारा- देवळाई आदर्श नगर परिषद होण्याच्या दृष्टीने विविध सूचना केल्या.