शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

‘सेट’ला मिळाले यूजीसीकडून ‘ग्रीन सिग्नल’

By admin | Updated: April 16, 2015 01:01 IST

औरंगाबाद : दीड वर्षापासून रखडलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेला (सेट) ‘यूजीसी’कडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

औरंगाबाद : दीड वर्षापासून रखडलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेला (सेट) ‘यूजीसी’कडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास ‘सेट’साठी ‘नोडल एजन्सी’ म्हणून पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ मिळाली असून, वर्षातून दोन परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय या विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांतील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यूजीसीमार्फत अधिव्याख्यातापदासाठी राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) आणि राज्यस्तरीय पातळीवर ‘सेट’ अशा दोन पात्रता परीक्षा घेतल्या जातात. वर्षातून दोन वेळा होणाऱ्या या परीक्षांपैकी ‘नेट’ ही इंग्रजी आणि हिंदी भाषेत, तर ‘सेट’ ही सर्व प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाते. अनेक राज्यांतील विद्यार्थ्यांचे पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण हे प्रादेशिक भाषांमधून झालेले असते. त्यामुळे त्यांना इंग्रजी किंवा हिंदी भाषेतून ‘नेट’ देणे कठीण जाते. त्यावर यूजीसीने पर्याय म्हणून १९९५ पासून ‘सेट’ सुरू केली होती. या परीक्षेसाठी महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला १९९५ पासून ‘नोडल एजन्सी’ म्हणून नियुक्त केले होते. यासंदर्भात ‘सेट’ विभागाचे सहायक कुलसचिव राजेश राहेरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पुणे विद्यापीठाला ५ वर्षांसाठी ‘नोडल एजन्सी’ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर प्रत्येक वेळा ५-५ वर्षांची मुदतवाढ मिळाली. त्यानुसार दोन्ही राज्यांत २०१३ पर्यंत नियमितपणे ‘सेट’चे आयोजन केले. १ डिसेंबर २०१३ पासून मुदतवाढीस मान्यता मिळालेली नव्हती म्हणून तब्बल दीड वर्ष ‘सेट’ रखडली होती. मुदतवाढीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रयत्न केल्यानंतर नुकतेच ‘यूजीसी’ने या विद्यापीठाला मुदतवाढीचे पत्र दिले आहे. आतापर्यंत ३० विषयांची एक परीक्षा घेतली जात होती. यापूढे ती ३२ विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. नोडल एजन्सी म्हणून पुणे विद्यापीठाला नुकतीच मुदतवाढ मिळाली. त्यानुसार विद्यापीठाने ‘सेट’ घेण्याबाबत नियोजन सुरू केले आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही परीक्षा घेतली जाईल. मेमध्ये सेटची जाहिरात निघेल. शिवाय उर्दू व फॉरेन्सिक सायन्स या विषयांची ‘सेट’ घेण्यास पहिल्यांदाच मान्यता दिलेली आहे, असे विभागाचे सहायक कुलसचिव राजेश राहेरकर यांनी कळविले.