शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टँकरसाठी सरपंचाने घेतले विष

By admin | Updated: December 18, 2015 00:18 IST

गंगापूर : टँकर सुरू न झाल्याने येथील सरपंच विक्रम राऊत यांनी पंचायत समिती कार्यालयात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

गंगापूर : तालुक्यातील दहेगाव ग्रुप ग्रामपंचायतने टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करून तीन महिने लोटले तरी अद्याप टँकर सुरू न झाल्याने येथील सरपंच विक्रम राऊत यांनी पंचायत समिती कार्यालयात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी (दि.१७) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. बेशुद्धावस्थेतील सरपंचावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विक्रम राऊत हे दुपारी विषारी औषधीच्या बाटलीसह गंगापूर पंचायत समिती कार्यालयात आले. रोजगार हमी योजनेच्या दालनात पोहोचताच त्यांनी हातातील बाटलीचे झाकण उघडण्याचा प्रयत्न केला. कार्यालयात उपस्थित काही नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी बाटली हिसकावण्याचा प्रयत्न केला; मात्र राऊत यांनी कुणासही न जुमानता भिंतीला बाटली जोरात मारली. बाटली फुटून त्यातील औषध खाली पडताच राऊत यांनी पडलेले औषध हाताने भरून तोंडात टाकले. औषध पोटात गेल्याने काही वेळातच त्यांची शुद्ध हरपली. उपस्थित जमावाने तात्काळ रिक्षा बोलावून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविले. पुढील उपचारासाठी औरंगाबादेत पाठविण्यात आले आहे.