वाळू चोरणाऱ्या गाढवांना पोलीस ठाण्याची हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 23:53 IST2019-03-20T23:52:25+5:302019-03-20T23:53:22+5:30

गाढवांच्या मदतीने पैठण येथील गोदावरी नदीच्या पात्रातून होणारी वाळूचोरी रोखण्यासाठी बुधवारी पैठण पोलिसांनी कारवाई केली. यात ३५ गाढवांना ताब्यात घेण्यात आले.

 Sand stolen donkeys should be used for the police station | वाळू चोरणाऱ्या गाढवांना पोलीस ठाण्याची हवा

वाळू चोरणाऱ्या गाढवांना पोलीस ठाण्याची हवा

पैठण : गाढवांच्या मदतीने पैठण येथील गोदावरी नदीच्या पात्रातून होणारी वाळूचोरी रोखण्यासाठी बुधवारी पैठण पोलिसांनी कारवाई केली. यात ३५ गाढवांना ताब्यात घेण्यात आले.
काही वेळ पोलीस ठाण्यात त्यांना आणून नंतर सोडून देण्यात आले. मात्र, या मुक्या जनावरांच्या जिवावर वाळूचोरी करून पैसा कमावणारे वाळू तस्कर मात्र फरार झाले होते. पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी आता या गाढवांच्या मालकांचा कसून शोध घेत आहेत.

Web Title:  Sand stolen donkeys should be used for the police station