शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नेट-सेट नसलेल्यांनाही वेतननिश्चितीचे फायदे

By admin | Updated: November 16, 2015 00:41 IST

औरंगाबाद : जे प्राध्यापक नेट-सेट नाहीत; परंतु त्यांनी कमीत कमी सहा वर्षे सेवा पूर्ण केलेली असेल, अशा प्राध्यापकांना करिअर अ‍ॅडव्हान्स स्कीमअंतर्गत वेतननिश्चितीचे फायदे द्यावेत,

औरंगाबाद : जे प्राध्यापक नेट-सेट नाहीत; परंतु त्यांनी कमीत कमी सहा वर्षे सेवा पूर्ण केलेली असेल, अशा प्राध्यापकांना करिअर अ‍ॅडव्हान्स स्कीमअंतर्गत वेतननिश्चितीचे फायदे द्यावेत, असे अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशामुळे उच्च तंत्रशिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. नेट-सेट संघर्ष समितीच्या न्यायालयीन लढाईला यश आल्याने २१ प्राध्यापकांना न्याय मिळाला आहे. मात्र, या निकालाने असंख्य प्राध्यापकांच्या न्यायाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. गोविंद काळे यांनी दिली. नेट-सेट नसलेल्या प्राध्यापकांना करिअर अ‍ॅडव्हान्स स्कीम (२) चे लाभ मिळावेत यासाठी समितीने लढा सुरू केला होता. यूजीसीने १९९१ ते २००० यादरम्यानच्या काळातील प्राध्यापकांना नेट-सेटमधून सूट देण्यास नकार दिला होता. त्यामुळे बिगर नेट-सेट प्राध्यापकांचे सेवा सातत्य नियुक्ती दिनांकापासून ग्राह्य धरून कॅशचे लाभ मिळावेत यासाठी समितीच्या उपाध्यक्षा आशा बीडकर व अन्य २० प्राध्यापकांनी राज्य शासनाच्या विरोधात २०१० मध्ये औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. २०१३ मध्ये खंडपीठाने प्राध्यापकांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, त्याला तत्कालीन आघाडी शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने प्राध्यापकांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, शासनाने त्याची दखल घेतली नाही. म्हणून समितीने मे २०१५ मध्ये पुन्हा सर्वोच्च न्यायालयात विशेष परवानगी अर्ज केला. या अर्जावर झालेल्या सुनावणीत जे प्राध्यापक नेट-सेट नाहीत; परंतु त्यांनी कमीत कमी सहा वर्षे सेवा पूर्ण केलेली असेल, अशा प्राध्यापकांना करिअर अ‍ॅडव्हान्स स्कीमअंतर्गत वेतननिश्चितीचे फायदे द्यावेत, असे आदेश दिले.